अल्याड पल्याड चित्रपटाला प्रेक्षकांची दाद

अल्याड पल्याड चित्रपटाला प्रेक्षकांची दाद
प्रतिनिधी गणेश तळेकर 
अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटालाही मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतून चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. २०० हून अधिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत सगळ्या वर्गामध्ये उत्सुकता पहायला मिळतेयप्रसार माध्यमांतूनही चित्रपटाविषयी उत्सुकता होती आणि प्रदर्शनानंतरही बातम्या, समीक्षणांतून कौतुकाचा वर्षाव होतोय. रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज मराठीत अभावानेच पाहायला मिळतं. ‘अल्याड पल्याड’ च्या निमित्ताने एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षक व्यक्त करताहेत.  
आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे रहस्य याचा थरारक अनुभव देणारा एस. एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट ‘फुलटू एंटरटेनर’ असून मराठीत काहीतरी वेगळं बघायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे. आजवर मराठीत आलेला ‘उत्तम भयपट’ अशा शब्दांत चित्रपटाचे कौतुक प्रेक्षक करतायेत. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप