पोस्ट्स

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक

इमेज
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असेल. तसेच हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05पर्यंत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे व कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

इमेज
फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले  पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.२८) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे.   आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे. नेमके काय घडले? शनिवारी सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. चिठ्ठीतील भावनिक मजकूर समोर बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले ...

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला

इमेज
*जेरुसलेम/तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला.*.    यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. आज पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरे तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले, त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत असून इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तासाभरात इराणमधून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी काहींना रोखण्यात यश आले आहे, असे लष्कराने सांगितले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इर...

अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.

इमेज
अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.  अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले असताना काही मिनिटांतच ते कोसळले.                                     मात्र आता अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. प्रवाशांव्यतिरिक्त स्थानिक लोकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. अपघातस्थळी ढिगारा काढण्याचे काम अजूनही सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत २६५ जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र आता हा आकडा वाढल्याने आणखी धक्का बसला आहे. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे, तर स्थानिकांमध्ये ३३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार शुक्रवारी विमानाचा ढिगारा बाहेर काढणाऱ्या बचाव पथकांना क्रॅश झालेल्या ७८७-८ ड्रीमलाइनर विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि आणखी २९ मृतदेह सापडले. त्यामुळे...

भटके विमुक्तांचा अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चा

https://youtu.be/gbaEXJm1o40?si=kA3pkVT3a750KbO3 जनहित न्यूज महाराष्ट्र  9960504729

कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय.

इमेज
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलेय. दोन्ही देशातील कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याटे वाढत आहे, त्यामुळे निर्बंध लावले जाणार आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही धोक्याची घंटा वाजली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समजतेय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. २०२० ते २०२२ या काळात जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेय. कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय. कोरोना पुन्हा आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता उपाय योजना कराव्यात, असेही सांगितलेय. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात ९३ कोर...

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

इमेज
श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान  घर घेताना व बँक लोन करताना ग्राहकांनी बँकेतून खात्री करून होम लोन घ्यावे बदलापूर : जे पी रेजन्सि अंबरनाथ येथील प्रकरण समोर आले आहे श्रीराम हाउसिंग फायनान्स बँकचे कर्मचारी संतोष जाधव आणि त्याचे सहकारी यांनी एका गरीब महिलेला दिड पावणे दोन लाखाची फसवणूक केली आहे साडे सतरा लाखाचे लोन झाले असल्याचा चेक दाखवून अंबरनाथ पूर्व येथील जे पी रेजन्सीच्या पटेल या बिल्डरला 1 लाख रुपये भरणा करायला सांगितले आणि बदलापूर मधील रजिस्ट्रेशन ऑफिस येथे दहा हजार रुपये भरणा करून घराचे कागदपत्र रजिस्टर करून दिले पूर्ण रक्कम भरणा होताच श्रीराम हाउसिंग फायनान्स चे कर्मचारी अंधेरी ब्रांचचे राकेश लोन धारकाच्या घरी आले व सदर महिलेकडून महिन्याचा ई एम आय ची रक्कम भरणा करून घेतली  एवढे पैसे भरणा केल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला घराची चावी देत आहोत असे बिल्डरच्या ऑफिस मधील कर्मचारी पायल बसंतानी यांचा कडून सांगण्यात आले होते त्या वेळी बँकेचे कर्मचारी संतोष जाधव यांनी सुद्धा 17 तारखेला जे पी बिल्डर यांना स...