श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक
श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान
घर घेताना व बँक लोन करताना ग्राहकांनी बँकेतून खात्री करून होम लोन घ्यावेबदलापूर : जे पी रेजन्सि अंबरनाथ येथील प्रकरण समोर आले आहे श्रीराम हाउसिंग फायनान्स बँकचे कर्मचारी संतोष जाधव आणि त्याचे सहकारी यांनी एका गरीब महिलेला दिड पावणे दोन लाखाची फसवणूक केली आहे साडे सतरा लाखाचे लोन झाले असल्याचा चेक दाखवून अंबरनाथ पूर्व येथील जे पी रेजन्सीच्या पटेल या बिल्डरला 1 लाख रुपये भरणा करायला सांगितले आणि बदलापूर मधील रजिस्ट्रेशन ऑफिस येथे दहा हजार रुपये भरणा करून घराचे कागदपत्र रजिस्टर करून दिले पूर्ण रक्कम भरणा होताच श्रीराम हाउसिंग फायनान्स चे कर्मचारी अंधेरी ब्रांचचे राकेश लोन धारकाच्या घरी आले व सदर महिलेकडून महिन्याचा ई एम आय ची रक्कम भरणा करून घेतली एवढे पैसे भरणा केल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला घराची चावी देत आहोत असे बिल्डरच्या ऑफिस मधील कर्मचारी पायल बसंतानी यांचा कडून सांगण्यात आले होते त्या वेळी बँकेचे कर्मचारी संतोष जाधव यांनी सुद्धा 17 तारखेला जे पी बिल्डर यांना साडे सतरा लाखाचा चेक देतो असे सर्वांसमोर सांगितले होते परंतु गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टीचा दिवस असताना बिल्डरच्या ऑफिस मधून पायल बसंतांनी ह्या महिलेचा फोन आला आणि त्याच फोन वरून श्रीराम हाऊसिंग फायनान्सचे कर्मचारी संतोष जाधव यांना लाईन वर घेतले तेव्हा त्या बँक कर्मचाऱ्यांनी ग्राहक महिलेच्या पतीला उलट सुलट बोलणे सुरू केले त्याचा आवाज आणि आसपास चा परिसर याचा आवाज मात्र समजून येत होता की तो व्यक्ती दारूच्या नशेत बोलत होता गुढी पाडव्याच्या दिवशी घराची चावी मिळण्या ऐवजी ग्राहकांनाच शिव्या बसतं होत्या समोरून बँक कर्मचारी ग्राहकाची औकात काढतं होता झक..मारायला, लोन काढता का? असे दारूच्या नशेत बोलत होता ग्राहकांनी बिल्डरच्या ऑफिस मध्ये फोन केला आणि तात्काळ बिल्डर च्या ऑफिस मध्ये जाऊन तक्रार केली असता बिल्डर चे कर्मचारी हितेश पटेल यांनी सुद्धा फोन केला बिल्डरच्या महिला कर्मचारी पायल यांनी त्यांचे पितळ उघडे पडू नये यासाठी ग्राहकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ग्राहकांनी मोबाईल रेकॉर्डिंग हितेश पटेल यांना ऐकवली रेकॉर्डिंग ऐकून हितेश पटेल यांनी बँक कर्मचारी याला ऑफिस मध्ये बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु तो नशे मध्येच बोलतं होता एवढ्या लोकांनी फोन करून सुद्धा संतोष जाधव बिल्डरच्या कार्यालयात आला नाही याचा अर्थ असा की यामध्ये बिल्डरचेही संगनमत असल्याचा संशय ग्राहकाला येत आहे या सर्वांची तक्रार ग्राहक यांनी श्रीराम होम फायनान्स च्या हेल्प लाईन नंबर वर केली असता त्यांनी माहिती दिली की बदलापूर ब्रांच मधील श्रीराम हाउसिंग फायनान्स या ठिकाणी जाऊन आपण बँक मॅनेजर यांच्याशी भेटावे अशी माहिती दिली माहिती मिळताच ग्राहक बदलापूर येथील श्रीराम फायनान्स बँक मध्ये जाऊन मॅनेजर यांना भेटले आणि परिस्थितीची माहिती दिली ग्राहकाची तक्रार ऐकून मॅनेजर यांनी सांगितले की महिन्याच्या एंडिंग पर्यंत आम्ही बिल्डरला चेक देतो असे दोन्ही ही मॅनेजर यांनी सांगितले त्या वेळी ग्राहकांनी जेपी रेजन्सी च्या महिला कर्मचारी निकिता मॅडम यांना फोनवर सूचना दिली त्या वेळी बँक मॅनेजर यांनी जे पी बिल्डर च्या महिला कर्मचारी निकिता मॅडम यांना फोनवर सांगितले की आम्ही एका आठवड्यात 17,50.000 साडे सतरा लाख रुपयांचा चेक देतो असे आश्वासन दिले होते त्या वेळी निकिता मॅडम यांनी सुद्धा मॅनेजर यांना सांगितले की बिल्डर ऑफिस मधून काही कागद पत्र पाहिजे असतील तर मला फोन करून मागवू शकता मी अपणास पाठवून देईन
लोनधारक यांचे वडील बँकेत त्यांच्या सोबत माहिती घेण्या साठी आले होते म्हणून श्रीराम हाऊसिंग फायनान्सचे मॅनेजर यांनी केले नाटक
दोन्हीही मॅनेजरने ग्राहकांची समजूत काढली व संतोष जाधव यांनी जे काही अपशब्द वापरले त्या बद्दल त्याला माफी मागण्यास सांगू असे सांगितले यापुढे पुन्हा असे घडणार नाही याचीही आम्ही दक्षता घेऊ असेही ते म्हणाले
त्या वेळी संतोष जाधव त्याच ठिकाणी उपस्थित होता मॅनेजर यांनी सांगितले की त्याची दोन लहान मुले आहेत
अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा लोनधारकांना उर्वरित वाढीव दोन महिन्याची बँक स्टेटमेंट द्या बाकीचे कागद पत्र संतोष कडे आहेत
अशी मागणी केली लोन धारकानी दुसऱ्याच दिवशी दोन्हीही महिन्याच्या बँक स्टेटमेंट बँक मॅनेजरला दिल्या परंतु महिना संपला तरी सुद्धा बिल्डरला चेक दिला नाही लोनधारकांनी पुन्हा बँक मॅनेजरला फोन केला असता मॅनेजरने सुद्धा उडवा उडवी चे उत्तरे देण्यास सुरुवात केली या प्रकरणाांमध्ये या दोन्हीही मॅनेजरचे सुद्धा षडयंत्र असल्याचा संशय आहे, कारण लोनधारकासी गोड बोलून बँक कर्मचारी संतोष जाधव यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या बँक मॅनेजर यांनी शिवीगाळ करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही बदलापूर ब्रांचचे दोन मॅनेजर कदम आणि प्रकाश यांनी आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे असा संशय लोनधारकांनी व्यक्त केला आहेबिल्डर आणि बँक यांनी हे सर्व षडयंत्र रचले असल्याचा संशय लोन धारकांना आला आहे
सध्या बँक मॅनेजर फोन उचलत नाही बँक कर्मचारी सुद्धा फोन उचलत नाही आणि बिल्डरचे कर्मचारी सुद्धा फोन उचलत नाही म्हणून लोन धारकांनी पत्रकारांना ही माहिती दिली तेव्हा लोन धारकांच्या तक्रारीनुसार
पत्रकारांनी सुद्धा श्रीराम हाउसिंग फायनान्सचे मॅनेजर यांना भेटण्यासाठी वेळ मागितला असता मॅनेजरने पत्रकारांना वेळ तर दिला मात्र पत्रकार भेटण्यासाठी गेले तेव्हा दोन्ही ही मॅनेजर रजेवर गेले असल्याची माहिती मिळाली संतोष जाधव यांना फोन केला असता तो सुद्धा रजेवर असल्याचे सांगितले बिल्डरचे कर्मचारी हितेश पटेल यांना फोन केला असता त्यांनी सुद्धा माहिती दिली की ते सुद्धा रजेवर आहेत असे सांगितले अखेर लोन धारकांनी आपल्या वडिलांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली असता लोनधारक यांच्या वडिलांना आपल्या मुलांची फसवनुक झाली असल्याचा संशय आला आणि त्यांनी बँकेत फोन करून विचारणा केली असता बँक मॅनेजर आणि कर्मचारी यांनी लोन धारक यांच्या वडिलांना फोन वर म्हणाले की तुम्ही थर्ड पार्टी आहात तुम्ही आम्हाला विचारणारे कोण ? बँक मॅनेजर यांच्या दादागिरीला आळा घालण्याकरिता ग्राहकांच्या वडिलांनी थेट श्रीराम होम फायनान्स चे बदलापूर कार्यालय या ठिकाणी जाऊन मॅनेजर यांची भेट घेतली असता त्यांनी उडवा उडविचे उत्तर देणे सुरू केले श्रीराम होम फायनान्सचे अधिकारी वर्गाची वर्तणूक बघून ग्राहकांच्या वडिलांना खात्री पटली की मुलांची फसवणूक झाली आहे
श्रीराम हाउसिंग फायनान्सचा ग्राहकांना फसवण्याचा धंदा उघडकीस आणण्यासाठी लोनधारक यांच्या वडिलांनी आता पुढाकार घेतला असून जमेल त्या मार्गाने या चांडाळ चौकडी आणि बिल्डर यांचा फसवणुकीचा गोरख धंदा बंद केल्या शिवाय राहणार नाही ?
नाहीतर ही चांडाळ चौकडी अनेक गरीब नागरिकाची फसवणूक करतील या साठी पुढाकार घेतला आणि जे पी बिल्डर यांना फोनवर माहिती दिली तेव्हा बिल्डर यांनी सांगितले की लवकरच आपण या विषयावर मीटिंग करू मात्र या नंतर पुन्हा दोन तीन महिने झाले तरी बिल्डर यांनी मीटिंग घेतली नाही यामुळे ग्राहकांच्या वडिलांना आपल्या मुलांची फसवणूक करण्यामागे पूर्णपणे षडयंत्र रचले गेले असल्याचे समजले दीड पावणेदोन लाखाची फसवणूक म्हणजे सामान्य नागरिकांची खूप मोठी फसवणूक आहे असेच जर बिल्डर आणि श्रीराम होम फायनान्स यांनी ग्राहकांची फसवणूक केली तर महाराष्ट्रात लाखो ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्राहकांच्या वडिलांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती केली आहे की श्रीराम होम फायनान्स या बँकेकडून किंवा जेपी रेजन्सी या बिल्डर कडून व्यवहार करीत असताना कृपया सावधपणे व्यवहार करावा असे आवाहन फसवणूक झालेल्या लोनधारक यांच्या वडिलांनी नागरिकांना केले आहे ज्याप्रमाणे आमची फसवणूक झाली आहे तशीच फसवणूक तुमची होत असेल तर गप्प बसू नका तुमच्या गप्प बसण्या मुळे असे फसवणूक करणारे बँकर्स आणि बिल्डर अनेक गरीब नागरिकांचे घरे उद्धस्त करतील
सध्या जे पी रेजन्सी चे बिल्डर गुजरातला गेल्याची माहिती जेपी रेजन्सी चे कर्मचारी हितेश पटेल यांनी दिली असून जे पी रेजन्सी चे बिल्डर आल्यावर आपण मीटिंग करू असे आश्वासन दिले आहे
या मीटिंगमध्ये लोनधारकांना न्याय नाही मिळाला तर ?
साडे सतरा लाखाचा चेक मंजूर झालेला दाखवून दिड पावणे दोन लाख रुपये लुबाडणाऱ्या बिल्डर आणि बँक यांच्या विरुद्ध लवकरच लोनधारक तक्रार दाखल करून हा खटला कोर्टात दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे तसेच सर्व नागरिकांना एक संदेश दिला आहे की आपण जर घर घेत असाल तर बँक आणि बिल्डर यांची खात्री करूनच घर घ्या कारण आमची तर फसवणूक झाली परंतु तुमची फसवणूक होऊ नये यासाठी सावधान राहून होम लोन करा असे फसवणूक झालेल्यापरिवाराचे म्हणणे आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद