पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता

इमेज
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रतिनिधी गणेश तळेकर  ऑल द बेस्ट नाटकाला रसिक मायबापांनी तुफान रिस्पॉन्स दिला आहे. नाटकाचे प्रयोग धुमधडाक्यात सुरू आहेत. माझं काम आवडलं खूप आवडलं असं प्रयोगानंतर रसिक मायबाप सांगतात तेव्हा खूप आनंद होतो. या आनंदात आणखीन एक भर पडली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता" हा पुरस्कार मला ऑल द बेस्ट नाटकासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार माझे अत्यंत लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आणि दिग्गज दिग्दर्शक व शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सर यांच्या हस्ते मला मिळाल्याने आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना खूप भारावून गेलो. महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय शरद पवार साहेब.. उद्योग मंत्री उदय सामंत साहेब.. माननीय शशी प्रभू साहेब.. दिग्गज अभिनेते निर्माते व अध्यक्ष प्रशांत दामले सर, अशोक हांडे सर, आणि नाटक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मी मनापासून आभार मानतो. तसेच ऑल द बेस्ट नाटकाच

*रसिकाचा डॅशिंग लूक*

इमेज
*रसिकाचा डॅशिंग लूक* छोट्या आणि मोठ्या पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिका करत अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. आगामी ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिका साकारणार आहे. नुकतंच तिचं पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यात ती बेधडक आणि डॅशिंग लूक मध्ये दिसत आहे.  झाशा या व्यक्तिरेखेत ती या चित्रपटात दिसणार आहे. व्हीलनच्या ताफ्यात राहून आपल्या भावासोबत झालेल्या अन्यायाचा बदला ती कशाप्रकारे घेते? हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे.  रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.      या भूमिकेबद्दल बोलताना रसिकाने सांगितलं कि, ‘ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं’. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्य

ग्यानबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली

इमेज
तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ग्यानबा तुकारामाच्या गजराने देहू दुमदुमून निघाली जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ग्यानबा तुकारामाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता पुणे : जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ग्यानबा तुकारामाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालताच पालखीचा इनामदार वाड्यात पहिला मुक्काम असेल. तिथं रात्री आरती, मग कीर्तन होईल. लाखोंच्या संख्येने देहूत वारकरी दाखल झाले आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाजारांचा ३३९ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. ग्यानबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती. काल पासून देहूत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. इंद्रायणी तिरी वैष्णवांचा मेळा भरला होता.     सकाळी इनामदार वाड्यात जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. तिथून टाळ मृदंगच्या गजरात मुख्य मंदिरात प

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, ढाबे जमीनदोस्त; महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील गुटखा विक्री टपऱ्यांना सील

इमेज
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, ढाबे जमीनदोस्त; महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील गुटखा विक्री टपऱ्यांना सील कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदा बीअर-महिला बार, हुक्का पार्लर, नृत्यबार, ढाबे, पब्ज यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने गुरुवारपासून पालिका हद्दीतील बेकायदा बीअरबार, नृत्यबार, मद्यालये, हुक्का पार्लर, महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील प्रतिबंधित खाद्य वस्तू विक्री केंद्रे आस्थापना भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. दोन दिवसात सुमारे १०० हून अधिक आस्थपनांवर कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात सर्व बेकायदा बार, ढाबे चालकांना पालिका-पोलिसांनी समन्वयाने नोटिसा पाठविल्या होत्या. पावसाळा सुरू असल्याने पालिकेकडून कारवाई होणार नाही या विचारात बार चालक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश असल्याने या कारवाईत पालिका अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली तर पालिका प्रशासन संबंधितांवर कारवाई करील. पोलिसांनी सहकार्य केले नाहीतर वरिष्ठांनी तशी कठोर भूमिका घेण्याचे पालिका आयुक्त जाखड यांनी स्पष्ट केले होते.    टिटवाळा, मांडा

संघर्ष बिगर काही खरं नसतं

इमेज
संघर्ष बिगर काही खरं नसतं"  हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. ''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा''  ५ जुलै २०२४ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई  गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झालाय. त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओक  ने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, च

पुण्यापाठोपाठ ठाणे, मीरा भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना स्पष्ट निर्देश

इमेज
पुण्यापाठोपाठ ठाणे, मीरा भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना स्पष्ट निर्देश ठाणे : ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच, शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना आज दिलं.            पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचं नुकतंच निदर्शनास आलं होतं. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामं बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीनं ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामं ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. अमली पदार्थ मुळे तरुणाईचे मोठे नुकसान हा विळखा तात

घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक भेटीला

इमेज
घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक भेटीला