कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, ढाबे जमीनदोस्त; महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील गुटखा विक्री टपऱ्यांना सील

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, ढाबे जमीनदोस्त; महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील गुटखा विक्री टपऱ्यांना सील

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदा बीअर-महिला बार, हुक्का पार्लर, नृत्यबार, ढाबे, पब्ज यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने गुरुवारपासून पालिका हद्दीतील बेकायदा बीअरबार, नृत्यबार, मद्यालये, हुक्का पार्लर, महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील प्रतिबंधित खाद्य वस्तू विक्री केंद्रे आस्थापना भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. दोन दिवसात सुमारे १०० हून अधिक आस्थपनांवर कारवाई करण्यात आली.

गेल्या आठवड्यात सर्व बेकायदा बार, ढाबे चालकांना पालिका-पोलिसांनी समन्वयाने नोटिसा पाठविल्या होत्या. पावसाळा सुरू असल्याने पालिकेकडून कारवाई होणार नाही या विचारात बार चालक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश असल्याने या कारवाईत पालिका अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली तर पालिका प्रशासन संबंधितांवर कारवाई करील. पोलिसांनी सहकार्य केले नाहीतर वरिष्ठांनी तशी कठोर भूमिका घेण्याचे पालिका आयुक्त जाखड यांनी स्पष्ट केले होते.   

टिटवाळा, मांडा, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, मुरबाड रस्ता, आंबिवली, आधारवाडी, कल्याण पूर्वेतील नेतिवली, मलंगड-नेवाळी रस्ता, शिळफाटा रस्ता, डोंबिवलीतील पाथर्ली नाका, आयरे, डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा, गरीबाचापाडा, गणेशनगर, कुंभारखाणपाडा, उमेशनगर भागातील बेकायदा बार, महिला बार, ढाबे जेसीबीच्या साहाय्याने पालिका पथकांनी जमीनदोस्त केले.

सोनारपाडा, दावडी भागातील तळघरात चोरून महिला सेविकांच्या माध्यमातून नृत्य बार चालविले जातात. हे बारही भुईसपाट करण्यात आले. डोंबिवलीत पाथर्ली येथील बेकायदा शिल्पा बार फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने जमीनदोस्त केला. आयरे, गांधीनगर शाळांच्या परिसरातील पानटपऱ्या ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या पथकाने बंद केल्या.

डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगरमध्ये स्वामी विवेकानंद शाळेजवळील पानटक्का या दुकानात साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना प्रतिबंधित गुटख्याचा साठा, नशा येण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, गांजापूड आढळून आली. हा सर्व साठा पालिका, विष्णुनगर पोलिसांनी जप्त करून पानटक्का दुकान मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या पान टपऱ्या सील ठोकून बंद करण्यात आल्या. कोळेगाव येथील साई कृपा रुक्मिणी हॉटेल ई प्रभाग साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने जमीनदोस्त केले. आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी मलंगगड रस्त्यावरील कशीश बार, रंगीला बार जमीनदोस्त केल

डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगरमध्ये स्वामी विवेकानंद शाळेजवळील पानटक्का या दुकानात साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना प्रतिबंधित गुटख्याचा साठा, नशा येण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, गांजापूड आढळून आली. हा सर्व साठा पालिका, विष्णुनगर पोलिसांनी जप्त करून पानटक्का दुकान मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या पान टपऱ्या सील ठोकून बंद करण्यात आल्या. कोळेगाव येथील साई कृपा रुक्मिणी हॉटेल ई प्रभाग साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने जमीनदोस्त केले. आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी मलंगगड रस्त्यावरील कशीश बार, रंगीला बार जमीनदोस्त केल

ब प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी कोळवली येथील जेबी लाऊंज, खडकपाडा येथील फूड स्टॉल जमीनदोस्त केले. याशिवाय शाळा, बिर्ला महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई केली. अशीच कारवाई ड प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी केल

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या उपस्थितीत या कारवाया करण्यात आल्या.                  या कारवाईमुळे बार चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, शाळा परिसरातील पानटपऱ्यांवर पोलीसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात येत आहे. या आस्थापना पुन्हा सुरू होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. – डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप