अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेताप्रतिनिधी गणेश तळेकर
 ऑल द बेस्ट नाटकाला रसिक मायबापांनी तुफान रिस्पॉन्स दिला आहे. नाटकाचे प्रयोग धुमधडाक्यात सुरू आहेत. माझं काम आवडलं खूप आवडलं असं प्रयोगानंतर रसिक मायबाप सांगतात तेव्हा खूप आनंद होतो. या आनंदात आणखीन एक भर पडली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता" हा पुरस्कार मला ऑल द बेस्ट नाटकासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार माझे अत्यंत लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आणि दिग्गज दिग्दर्शक व शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सर यांच्या हस्ते मला मिळाल्याने आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना खूप भारावून गेलो. महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय शरद पवार साहेब.. उद्योग मंत्री उदय सामंत साहेब.. माननीय शशी प्रभू साहेब.. दिग्गज अभिनेते निर्माते व अध्यक्ष प्रशांत दामले सर, अशोक हांडे सर, आणि नाटक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मी मनापासून आभार मानतो. तसेच ऑल द बेस्ट नाटकाचे लेखक दिग्दर्शक माझे बाबा देवेंद्र पेम सर व ऑल द बेस्ट चे सर्व सहकलाकार तंत्रज्ञ व बॅकस्टेजच्या संपूर्ण टीमचा मी अत्यंत ऋणी आहे. या साऱ्यांमुळे.. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळणे ही आपल्या कामाची पावती तर असतेच पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देते. यापुढे मी रंगभूमीची सेवा करताना अशाच चांगल्या भूमिका करत राहण्याचा आणि रसिक मायबापांचं मनोरंजन करण्याचा मनापासून आयुष्यभर प्रयत्न करत राहीन. असे मयुरेश पेम म्हणाले व सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप