पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या

इमेज
बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या     अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे पॉर्नस्टार रिया बर्डे उर्फ बन्ना शेख भारतात वास्तव्य करत होती.    या मुलीने 3 मुलांचे खोटे जन्म दाखले आणि आधार कार्ड आणि पासपोर्टही तयार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्याकडे भारताचा पासपोर्टही आढळला असून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं उघड झालं आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका इथं एका चाळीत बांग्लादेशी कुटुंब राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता रिया बर्डे उर्फ बन्ना शेख ही त्या पत्त्यावर आढळून आली. रिया ही मूळची बांग्लादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत ती बेकायदेशीरपणे मागील 2 वर्षांपासून या ठिकाणी राहत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी एक प्रेस नोट जारी प्रसिद्ध केली आहे. अटक रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित होती आणि तिने अनेक पॉर्न

महाराष्ट्रातील बदलापूर बलात्कार प्रकरण कोण विसरेल. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. बलात्काराचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला

इमेज
महाराष्ट्रातील बदलापूर बलात्कार प्रकरण कोण विसरेल. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. बलात्काराचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला अक्षयला जेलमधून बाहेर काढले जात असताना त्याने अचानक पोलिसांवर गोळीबार केला.               पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो  ठार झाला. ही चकमक 10 मिनिटे चालली. गेल्या 10 मिनिटांत अक्षयसोबत काय घडले ते पॉइंट-टू-पॉइंट जाणून घ्या.. 13 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर येथील शाळेत दोन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ उडाला. लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतर हजारोंचा जमाव लोकल ट्रेनच्या रेल्वे ट्रॅकवर उतरला, त्यानंतर दगडफेकीची घटनाही समोर आली. 20 ऑगस्ट रोजी जमावाने आधी शाळेची तोडफोड केली आणि नंतर बदलापूर स्टेशनवर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निदर्शने केली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकल रेल्वे रुळांवर उतरल्या

घोडेगाव ग्रामपंचायती मध्येच दत्तात्रय पोखरकर यांचे आकस्मित रित्या निधन

घोडेगाव ग्रामपंचायती मध्येच दत्तात्रय पोखरकर यांचे आकस्मित रित्या निधन पुणे: दिनांक 23 घोडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२ इमारत नोंद रद्द करणेबाबत बजावलेल्या नोटिस संदर्भात सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा ग्रामपंचायत मध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली या संबंधी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी माहिती दिली, मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत घोडेगाव ने दत्तात्रय पोखरकर यांच्या करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२ येथील इमारत नोंद रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती. या नोटीस संदर्भात दत्तात्रय पोखरकर त्यांच्या पत्नी व अवधूत घोलप ग्रामपंचायत मध्ये गेले होते . यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असताना दत्तात्रय पोखरकर यांना अचानक त्रास झाला व ते खाली पडले. त्यांना त्वरित ग्रामपंचायतमध्ये आलेले अवधूत घोलप व इतर लोकांच्या सहाय्याने त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत झाल