बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या

बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या     अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे पॉर्नस्टार रिया बर्डे उर्फ बन्ना शेख भारतात वास्तव्य करत होती.   
या मुलीने 3 मुलांचे खोटे जन्म दाखले आणि आधार कार्ड आणि पासपोर्टही तयार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

तिच्याकडे भारताचा पासपोर्टही आढळला असून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं उघड झालं आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका इथं एका चाळीत बांग्लादेशी कुटुंब राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता रिया बर्डे उर्फ बन्ना शेख ही त्या पत्त्यावर आढळून आली. रिया ही मूळची बांग्लादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत ती बेकायदेशीरपणे मागील 2 वर्षांपासून या ठिकाणी राहत असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी एक प्रेस नोट जारी प्रसिद्ध केली आहे. अटक रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित होती आणि तिने अनेक पॉर्न किंवा सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पोर्न इंडस्ट्रीत रियाला आरोही आणि बन्ना शेख या नावानेही ओळखलं जातं. रियाची आई अंजली बांगलादेशची रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.

आईने अमरावतीत केलं लग्न

रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख काही वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आली आणि अमरावतीच्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर तिची मुलं बन्ना शेख, मोनी शेख आणि रियाज शेख यांचे बनावट जन्मदाखले वेगवेगळ्या ठिकाणाहून बनवून घेत त्याआधारे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड त्यांनी तयार केले. तसंच या बनावट कागदपत्रांचा वापर करून भारताचा पासपोर्टही त्यांनी मिळवला.

याच पासपोर्टच्या आधारे रुबी शेख ही अनेकदा बांग्लादेशला जाऊन आल्याचंही उघड झालं आहे. या सगळ्या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी नेवाळी नाका परिसरातून रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला बेड्या ठोकल्या आहेत. तर तिची आई रुबी शेख ही अरविंद बर्डे यांच्यासह कतारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिचा भाऊ आणि बहिणीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप