घोडेगाव ग्रामपंचायती मध्येच दत्तात्रय पोखरकर यांचे आकस्मित रित्या निधन
घोडेगाव ग्रामपंचायती मध्येच दत्तात्रय पोखरकर यांचे आकस्मित रित्या निधन
पुणे: दिनांक 23 घोडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२
इमारत नोंद रद्द करणेबाबत बजावलेल्या नोटिस संदर्भात सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा ग्रामपंचायत मध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली या संबंधी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी माहिती दिली, मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत घोडेगाव ने दत्तात्रय पोखरकर यांच्या करुजूदेवी डेव्हलपर्स सर्वे नंबर १९८/२ येथील इमारत नोंद रद्द करण्याबाबत नोटीस बजावली होती. या नोटीस संदर्भात दत्तात्रय पोखरकर त्यांच्या पत्नी व अवधूत घोलप ग्रामपंचायत मध्ये गेले होते . यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असताना दत्तात्रय पोखरकर यांना अचानक त्रास झाला व ते खाली पडले. त्यांना त्वरित ग्रामपंचायतमध्ये आलेले अवधूत घोलप व इतर लोकांच्या सहाय्याने त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत झाल्याचे जाहीर केले. याबाबत पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद