पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांचा आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...

इमेज
कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांचा आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले... कल्याण: अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला गुरुवारी सकाळी ठाण्यात आणण्यात आले. विशाल गवळीला बुधवारी बुलढाण्यातील शेगाव येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील तपासासाठी त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली.  कल्याणमधील घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे कठोर आणि स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विशाल गवळी याच्यावर पोलिसांकडून झटपट कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या घ...

महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे---- राज ठाकरे

महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे---- राज ठाकरे  कल्याणच्या योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने शेजाऱ्यांच्या मदतीसाठी आलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण केली. अखिलेश शुक्लाने सरकारी नोकरीचा धाक दाखवत मराठी भाषेविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य अरेरावी केली. त्यानंतर बाहेरच्या गुंडांना इमारतीमध्ये बोलवून शुक्लाने मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप व काठ्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर मराठी भाषिकांकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याप्रकरणावरुन भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्ता राहत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कल्याणच्या अजमेरा सोसायटीमध्ये शेजाऱ्यांसोबत धूप लावण्याच्या वादावरुन महाराष्ट्र शासनाच्या एमटीडी विभागात काम करणाऱ्या अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांसोबत जोरदार भांडण केले होते. त्यामुळे बाजूलाच राहणाऱ्या मराठी कुटुंबियांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने अखिलेश गुप्ता याने बाहेरून गुंड बोलवून मरा...