विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..
विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार.. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी या कर्जदारांवर लादले कर्जापेक्षा चारपट अधिक व्याज .
उल्हासनगर महानगरपालिका सफाई कर्मचारी यांनी सन 2011 मध्ये विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेमधून एकूण दीड लाख रुपये कर्ज घेतले होते कर्जदारांकडून तीस हजार रुपये शेअरचे आणि पंधरा हजार रुपये बुडीत खात्यात. जमा करून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख 5 हजार रुपयांमधून तीन हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी पतपेढीचे कर्मचारी यांनी चहा पाणी खर्च म्हणून घेतले होते बाकी शिल्लक एक लाख दोन हजार रुपये मात्र कर्जदारांच्या हातात दिले होते कर्ज देताना विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेचे कर्मचारी यांनी कर्जदारांचे बँक बुक आणि एटीएम कार्ड पतपेढीमध्ये जमा करून घेतले होते तसेच दिलेल्या कर्जाचा हप्ता तसेच शिशु उत्कर्ष ठेव. 100. दाम दुप्पट ठेव. 500 सभासद कल्याण निधी ठेव. 200 ही सर्व रक्कम जमा करून बाकी शिल्लक रक्कम 4400 रुपये कर्जाचा हप्ता म्हणून जमा करून घेत होते एकूण रुपये 5200 प्रमाणे मासिक हप्ता प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी पतपेढीच्या सानप मॅडम ह्या बँकेत येऊन कर्जदारांना पासबुक किंवा एटीएम कार्ड देऊन पैसे काढण्यास सांगत होत्या व कर्जदारांकडून मासिक हप्ता 5200 घेऊन जात होत्या. बाकीची पगाराची उर्वरित रक्कम कर्मचाऱ्यांना देत होत्या. असे अनेक वर्ष पतपेढीचा कारभार सुरू होता त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका अकाउंट सेक्शन मध्ये विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेने कर्जदारांची यादी देऊन पगारातूनच मासिक हप्ता कपात करून घेतला होता.काही कारणास्तव कर्जदार कर्मचाऱ्यांचे हप्ते थकले तर. कर्जदारांचे जामीनदार यांच्या कडून मासिक हप्ते भरणा करून घेतले. सन 2016 मध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे कर्ज फेड झाले होते त्या कर्जदारांनी आपले विठ्ठल रुक्मिणी पतपेढीतील शेअरचे तीस हजार रुपये व त्याचा डिव्हिडंट मागितला असता. त्यांना उडवा उडविचे उत्तर देत टाळाटाळ सुरू केली. परंतु विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था ही स्थानिक व देवाच्या नावावर चालणारी असल्यामुळे अनेक कर्मचारी नागरिक यांनी विश्वास टाकला होता की पतपेढी स्थानिक असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा दगा व धोका मिळणार नाही असे समजून कर्जदारानी पतपेढीच्या कर्मचारी सानप मॅडम यांच्यावर विश्वास टाकला होता. सानप मॅडम यांनी कर्जदारांना एवढे विश्वासात घेतले होते की कर्जदारांनी भरलेल्या मासिक हप्त्यांची पासबुक मध्ये सुद्धा नोंद करून घेतली नव्हती. सन 2016 पर्यंत अनेक कर्मचाऱ्यांनी कर्ज फेडले होते बाकी थोडे फार थकीत असलेले कर्जदार यांनी पतपेढी मध्ये कर्जदारांचे जमा असलेले सर्व इतर रक्कम एकत्र करून आम्हाला कर्जमुक्त करावे अशी विनंती केली होती. त्यामध्ये हरी चंदर आल्हाट. यांनी सुद्धा मागणी केली की. त्यांच्या जमा असलेल्या तीस हजार रुपये शेअर आणि त्याचा वार्षिक डिव्हीडंट तसेच इतर ज्या काही जमा रक्कमा असतील त्या पतपेढीने घ्याव्यात व आम्हाला कर्ज मुक्त करावेत अशी चर्चा सानप मॅडम यांच्याकडे केली यावेळी जामीनदार अनिल कचरू शेलार हे सुद्धा उपस्थित होते. तेव्हा सानप मॅडम यांनी तोंडी उत्तर दिले की. 2011 चे खाते असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या तुमच्याकडे वीस तीस हजार रुपये शिल्लक कर्ज आहे. तुमचे काही शेअर मध्ये पैसे असतील तर आम्ही तुम्हाला परत करू असे आश्वासन दिले व थोडा वेळ मागितला परंतु तब्बल दोन तीन वर्षे त्यांनी अजिबात दखल घेतली नाही 2019/20 मध्ये कोरोना काळ सुरू झाला आणि पतपेढी संस्थेचे कर्मचारी स्टाफ कमी असल्याच्या बतावण्या सुरू झाल्या कोरोनाचा बहाना करत कर्जदार यांच्या कामकाजाला पुढे ढकलण्यात आले परंतु 2024 मध्ये सानप मॅडम यांचे अकस्मात निधन झाले आणि त्याचाच फायदा पतपेढीने घेवून.लगेचच पुन्हा विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेने कर्ज वसुली त्याचप्रमाणे सुरू केले आणि जामीनदार व कर्जदार यांना वेठीस धरून मनमानी वसुली सुरू केली हरी आल्हाट यांचे जामीनदार अनिल कचरू शेलार यांच्याकडून हरी आल्हाट यांचे जामीनदार असल्यामुळे तब्बल पावणेदोन ते दोन वर्ष कर्ज वसुली केली असतानाही 2024 मध्ये अजूनही त्यांच्यावर पावणे चार लाख रुपये भरणा करा अशी खंडणी पद्धतीची मागणी बापू मांढरे करीत आहे.62 वर्षीय हरी आल्हाट ज्येष्ठ नागरिक असून उल्हासनगर महानगरपालिका मधील रिटायर कर्मचारी आहेत त्यांना मनपाकडून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मिळत असलेली मासिक पेन्शन विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेने भर नवीन वर्षात एसबीआय बँकेला पत्र देऊन आल्हाट यांच्यावर विठ्ठल रुक्मिणी पतपेढीचे तीन लाख 70 हजार एकशे सदुसष्ठ रुपये कर्ज असल्याचे पत्र देऊन आल्हाट यांचे बँक खाते होल्ड ( बंद ) केले असल्याने आल्हाट यांना त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह आणि कुटुंबाचे पालन पोषण तसेच त्यांच्या औषधाचा खर्च भागवता येत नसल्याने मानसिक त्रास होत आहे. विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संचालक मंडळ यांच्या त्रासाला कंटाळून हरी आल्हाट यांनी अमरण उपोषण करण्याचे योजिले असून उपोषणामध्ये न्याय न मिळाल्यास त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे याची सर्वस्व जबाबदारी विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्थेची असेल असे विनंती पत्र लवकरच शासन दरबारी व संबंधित पतपेढी व सहा. निबंधक अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्याकरिता निवेदन सादर करणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे.. तर एकी कडे कर्ज वसुली करण्यासाठी व हरी आल्हाट यांना बदनाम करण्याचा डाव सुद्धा रचला असून.25/10/2024 रोजी हरी आल्हाट यांच्या नावे कल्याण महात्मा पोलीस स्टेशन मध्ये आल्हाट हे कर्ज बुडविण्यासाठी पत्रकार असल्याचे भासवत असून फोन द्वारे कर्मचारी यांना धमकावत आहेत आणि मयत सानप मॅडम यांना बदनाम करीत आहेत अशी खोटी माहिती देवून पोलिसात एन सी आर दाखल करण्यात आली आहे असे पत्र उल्हासनगर महानगर पालिका मनसे युनियन अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या कार्यालयात टेबल वर ठेवून जात आहेत. ज्या प्रमाणे मांढरे माहिती देत आहेत ती माहिती पूर्ण पणे खोटी असून हरी आल्हाट हे भारत सरकार आर एन आय प्रमाणित पत्रकार असून. अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. जर पतपेढी चे कर्ज शिलक्क असते तर नक्कीच कर्जाची परतफेड केली असती. परंतु दाम दुप्पट कर्ज भरून सुद्धा व्याजावर व्याज लावून खंडणी पद्धतीने कर्ज वसुली करण्याचा डाव मांढरे करीत असतील तर ही खंडणी पद्धतीनेच कर्ज वसुली सुरू केली आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या या जाचाला कंटाळून आल्हाट यांना मानसिक तणाव व त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली असून. अश्या परिस्थितीत जर आल्हाट यांनी टोकाची भूमिका घेतली तर यासाठी विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेचे मांढरे आणि तानाजी जबाबदार असतील आल्हाट यांना न्याय मिळावा यासाठी निवेदन पत्राद्वारे शासन दरबारी लवकरच मागणी करणारं आहेत अशी माहिती आल्हाट परिवार यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद