हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढलेय. दोन्ही देशातील कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याटे वाढत आहे, त्यामुळे निर्बंध लावले जाणार आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर आता मुंबईतही धोक्याची घंटा वाजली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समजतेय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्याच्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. २०२० ते २०२२ या काळात जगात हाहाकार माजवणाऱ्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेय. कोरोनाची साथ पुन्हा एकदा आली आहे, पण हा कोरोनाचा व्हेरिंयट तितका गंभीर नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेय. कोरोना पुन्हा आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता उपाय योजना कराव्यात, असेही सांगितलेय. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात ९३ कोर...