प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित
प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित. सोलापूर : पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील निशांत सावतचे (वय २०) घराशेजारील चुलत वहिनी किरण सावतसोबत (वय २३) प्रेमसंबंध जुळले. बारावीपर्यंत शिकलेला निशांत कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता. २० दिवसांपूवी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनी 'सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे' असा तगडा प्लॅन आखला होता. निशांतने पंढरपूर हद्दीतून एक अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरून गावीही आणले होते. किरणच्या आई-वडिलांनी तिचा विवाह धुमधडाक्यात लावला होता. किरणला छोटी मुलगी आहे. पती तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा, पण निशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. काही महिन्यांनंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून गळा आवळला आणि तिचा मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजी...