गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.
गोकर्णचं किर्र जंगल, खतरनाक विषारी सापं, जीव कसा वाचवला?
थोडक्यात काय तर या जंगलामध्ये जाण्याची कोणीही हिंमत करत नाही, आणि गेलाच तर जिंवत परत येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. हा रामतीर्थ नावाचा जो डोंगर आहे, तीथे काही गुफा आहेत. त्यातील एका गुफेमध्ये एक रशियन महिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दोन मुलींसोबत राहात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.
उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या गोकर्णमध्ये रामतीर्थ नावाचा डोंगर आहे, या भागामध्ये किर्र जंगल आहे, हा प्रदेश चारही बाजुनं विशाल आणि उंच झाडानं वेढलेला आहे. घनदाट जंगलामुळे या भागात सहसा कोणाचाही वावर नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे या जंगलामध्ये माणसांचा फारसा वावर नसल्यामुळे अनेक हिंस्त्र आणि खतरनाक प्राण्यांचं हे जंगल अश्रयस्थान आहे. या जंगलामध्ये तब्बल वीस पेक्षा अधिक खतरनाक विषारी प्रजातीचे साप आढळून येतात.
थोडक्यात काय तर या जंगलामध्ये जाण्याची कोणीही हिंमत करत नाही, आणि गेलाच तर जिंवत परत येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. हा रामतीर्थ नावाचा जो डोंगर आहे, तीथे काही गुफा आहेत. त्यातील एका गुफेमध्ये एक रशियन महिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दोन मुलींसोबत राहात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
या भागांमध्ये वारंवार भूस्खलनाच्या घटना घडतात, असंच एक दिवस भूस्खलन झालं, मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी दबलं तर नाही ना? याचा शोध घेण्यासाठी पोलीस या जंगलात पोहोचले, मात्र तिथे त्यांना एका गुहेच्या बाहेर कपडे वाळत घातल्याचं दिसून आलं, एवढ्या घनदाट जंगलामध्ये गुहेत कोण राहात असावं? याबाबत त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. पोलीस या गुहेजवळ गेले, तिथलं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला.
या गुहेमध्ये एक मुलगी खेळत होती, तर तिची छोटी बहीण झोपली होती. त्याचवेळी ही रशियन महिला समोर आली, या महिलेला एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीना कुटीना असं या महिलेचं नाव आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या दोन मुलीसह याच जंगलामध्ये राहात आहे. ती आठ वर्षांपू्र्वी भारतात आली होती, मात्र व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील भारतातून परत गेलीच नाही.
ती आधी गोव्याला होती, त्यानंतर ती गोव्याहून गोकर्णला आली आणि इथेच आपल्या दोन मुलींसह राहू लागली. दरम्यान आता तिला पुन्हा एकदा रशियाला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यावेळी तिला एक प्रश्न विचारण्यात आला, की या जंगलामध्ये वीस पेक्षा अधिक खतरनाक आणि विषारी प्रजातीचे साप आढळतात, हिंस्त्र प्राणी आहेत? तुला भीती वाटली नाही का? तेव्हा या महिलेनं दिलेल्या उत्तरामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
महिला काय म्हणाली?
या महिलेनं सांगितलं की या पद्धतीनं गुहेत राहण्याचा मला खूप अनुभव आहे.आम्ही गुहेत राहात होतो याचा अर्थ असा बिलकूल नाही की आम्ही वाईट परिस्थितीमध्ये होतो, आम्ही इथे आनंदात राहत होतो. राहिला विषारी सापांचा प्रश्न तर ते अनेकदा मला गुहेच्या आसपास देखील दिसायचे, अनेकदा आम्ही ज्या गुहेत राहातो, त्यामध्ये देखील ते घुसायचेय. पण आम्ही त्यांना असं कधीच जाणू दिलं नाही की आमच्यापासून त्यांना धोका आहे, त्यामुळे कधीही संर्पदंशाची घटना घडली नाही, असं, या महिलेनं म्हटलं आहे. एवढंच नाही तर मला प्राण्यांपेक्षा माणसांची जास्त भीती वाटते असंही ही महिला यावेळी म्हणाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद