चेंढरे ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वप्रथम क्यु आर कोड घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत
चेंढरे ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वप्रथम क्यु आर कोड घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत
चेंढरे ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वप्रथम क्यु आर कोड घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत बनली आहे,
महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामपंचायत चेंढरे ता.अलिबाग जि.रायगड यांनी अमृतग्राम डिजीटल कर प्रणाली द्वारे घरपटटी व पाणीपटटी प्रत्येक घराला दिलेल्या क्यु आर कोड ने मोबाईल अँड्राईड ऍ़प द्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. ग्रामपंचायत आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा मुलभूत पाया म्हाणजे करवसुली आहे. घरपटटी व पाणी पटटी वसुलीची पारंपारीक पध्दत तितकीशी प्रभावी पणे राबविता येत नाही तसेच आजचे डिजीटल युग अँड्राईड चा वापर सर्रास पणे करीत आहेत त्याच प्रमाणे कोविड-19 च्या वेळेस नागरीकांना ब-याचश्या गोष्टी घरबसल्या मिळाव्यात आशा अपेक्षा सुध्दा निर्माण झालेल्या आहेत त्या अनुशंगाने सदरची अमृतग्राम डिजीटल करप्राणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसीत केलेली असून ती अत्यंत उपयुक्त आहे.
सदर करप्रणाली सर्वकष उपयुक्त होण्याच्या दृष्टीने रा.जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.किरण पाटील यांनी स्वत: सदर संगणकीय प्रणालीचे सुक्ष्म निरीक्षण करुन त्यामध्ये अतिरीक्त सुधारणा सुचवून त्याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल अशा प्रकारे विकसित करुन घेतली आहे. जेणे करुन पाणी पटटी आणि घरपटटी वसुली जास्तीत जास्त करण्यासाठी नियोजन आणि पाठपुरावा करणे सुलभ झाले आहे. व सदर डिजीटल करप्राणाली चेंढरे ग्रामपंचायत सोबतच रायगड जिल्हा परिषद तर्फे 800 च्या जवळपास ग्राम पंचायतीमध्ये विकसीत करण्यात येत आहे,
सदरच्या संगणकीय प्रणालीची वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत,
जुने पारंपारिक पध्दतीने घराच्या दरवाज्यावर दर्शविलेले घरक्रमांक आता क्यु आर कोड च्या पध्दतीद्वारे दर्शविले आहेत. सदर क्यु आर कोड द्वारे खातेधारकाची माहिती संकलीत केली आहे आणि त्याद्वारे खातेधारकाची घरपटटी व पाणी पटटी वसुली ही मोबाईल ऍ़प द्वारे यूपीआई, रोख, धनादेश, क्रेडिट कार्ड, डेबीटकार्ड तसेच नेट बँकींग द्वारे केली जाते व घरपटटी व पाणी पटटी वसुली झाल्याची पावती संबंधित खातेधारकास मोबाईल वर पीडीएफ स्वरुपात प्राप्त होते.
घरपटटी व पाणी पटटी चा डिमांड व सवलतीचा एसएमएस संगणकीय प्रणालीद्वारे खातेधारकास प्राप्त होईल.
घरपटटी व पाणी पटटी वसुली बाबतचे अहवाल पाहता येतात.
खातेधारकास आपली घरपटटी व पाणीपटटी घरबसल्या लिंक द्वारे सुध्दा भरता येणे शक्य झाले आहे.
या प्रणालीचा वापर करुन अँड्राईड मोबाईल आणि डेस्कटॉप कॉम्प्यूटर च्या माध्यमातून अधिकृत अधिकारी आणि कर्मचा-यांना वसुली करणे सोपे झाले आहे.
अशी ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली ग्रामपंचायतीच्या उप्तन्न वाढीस निश्चीतच आधारभूत झाली आहे.
चेंढरे ग्रामपंचायती मधील सर्व खातेदारांचा डेटा अचुकपणे अपडेट करुन ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली यंत्रणा यशस्वीपणे राबविणारी चेंढरे ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत आहे. त्याच सोबत ह्या उपक्रमामुळे ग्रामस्थ करदाते लोकांच्या स्थानिक अडचणी जसे रस्ते, कचरा, नाली, विजसमस्या व इतर समस्या सोडवणेकामी सुद्धा सदर सॉफ्टवेयर द्वारे मदत होते आहे,
सदरच्या अभूतपूर्व उपक्रमासाठी सरपंच सौ.स्वाती पाटील, सौ.प्रियदर्शनी पाटील, सौ.मिनल माळी, उपसरपंच सौ.प्रणिता म्हात्रे व सदस्य श्री.यतिन घरत, सौ.ममता मानकर, श्री.रोहन पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री.निलेश गावंड, टेक्नीकल टीम श्री.ललीत कदम, निलेश सावर्डेकर, देवेश गवस श्री.स्नेहल मोरे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे अथक प्रयास आहेत,
चेंढरे ग्रामपंचायत व अलीबाग जिल्हा परिषद येथील 800 च्या जवळपास जिल्हापरिषदांद्वारे राबवले जात असलेले हे उपक्रम उल्हासनगर महानगर पालिका मध्ये सुद्धा राबवले जावे जेणेकरुन पालिकेचे उतपन्न वाढेल, ह्या अनुषंगाने प्रत्यक्ष उपक्रमाची पाहणी करणेसाठी उल्हासनगर महानगर पालिका ब्रांड एम्बेसडर श्री राजेंद्र देठे, वी द पिपल एनजीओ चे मुख्य संविधान प्रचारक आनंदा होवाळ, सोहम फाउंडेशन चे नारायण वाघ व शशिकांत दायमा द्वारे चेंढरे ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देऊन माहिती घेण्यात आली,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद