उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दोनशे ते अडीचशे आशा स्वयंसेविका महिला यांना मनसे संघटनेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच मिळाले सानुग्रह अनुदान
उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दोनशे ते अडीचशे आशा स्वयंसेविका महिला यांना मनसे संघटनेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच मिळाले सानुग्रह अनुदान
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात दोनशे ते अडीचशे अशा स्वयंसेविका , ऊन ,वारा ,पाऊस, सहन करत घरोघरी जाऊन आपले कर्तव्य बजावत असतात परंतु त्यांची दखल उल्हासनगर महानगरपालिकेने कधीही घेतलेली नाही
कोरोना काळात स्वतःची काळजी न घेता नागरी सुविधासाठी त्यांनी उत्तम प्रकारे आपले कर्तव्य बजावले होते त्यांच्या या कार्याचे कौतुक सुद्धा केले गेले होते.
आशा स्वयंसेविका यांनी सुरुवातीच्या अनेक वर्षापासून उल्हासनगर महानगरपालिकेकडे दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळावा याकरिता मागणी केली होती अनेक वेळा आंदोलन सुद्धा केले होते
परंतु महानगरपालिकेने आज पर्यंत दखल न घेतल्याने आशा स्वयंसेविका यांनी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी महानगरपालिका गेटवर आरती ओवाळून तसेच संबंधित अधिकारी यांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येक आशा स्वयंसेविका यांनी एका बॉक्समध्ये पैसे टाकून ते बॉक्स संबंधित अधिकारी यांना आरती ओवाळून भेट करणार असल्याचे आंदोलन केले होते.
सतत आंदोलन करून सुद्धा आशा स्वयंसेविका यांना महानगरपालिकेकडून सानुग्रह अनुदान मिळत नव्हते त्यामुळे आशा स्वयंसेविका यांनी मनसे संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांचे कडे धाव घेतली असता दिलीप थोरात यांनी आशा स्वयंसेविका यांना मनसे युनियन संघटनेचे समर्थन दिले व उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांच्या कार्यालयात अशा स्वयंसेविका व त्यांचे पदाधिकारी यांनी बैठक घेऊन आशा स्वयंसेविका यांची मागणी आयुक्त यांचे कडे केली असता
उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांनी आशा स्वयंसेविका यांची त्वरित दखल घेऊन आशा स्वयंसेविका यांना 2100 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले ,
आशा स्वयंसेविका यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख व कामगार नेते दिलीप थोरात यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी योगीराज देशमुख, शालिग्राम सोनवणे, किशोर चव्हाण, पुंडलिक तरे, विकास वाघ, भगवान दवणे, तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल चे संपादक हरी आल्हाट व प्रतिनिधी हर्षद पठाडे उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट
जनहित न्यूज महाराष्ट्र
उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद