विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी अर्थात फेलोशीप साठी बेमुदत उपोषण

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी अर्थात फेलोशीप साठी बेमुदत उपोषण

. मुंबई: दिनांक ३१ॲक्टोंबर २०२३ ओबीसी (OBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग SBC समुदयातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी अर्थात फेलोशीप साठी बेमुदत उपोषण 
दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२३ पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू आहे
महाराष्ट्र शासनाच्या यादीनुसार इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग याच्या जातींची संख्या ४१२ असून एकूण लोकसंख्येच्या साधारण ५२% पेक्षा अधिक आहे. मात्र या समुदायाचे उच्चशिक्षणातील प्रमाण अत्यल्प आहे आणि संशोधनाच्या क्षेत्रात तर त्यांचे प्रमाण नगण्य आहे. २००८ मध्ये शिक्षणात आरक्षण लागू झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सरकार वरील जमातीतील लोकांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखीत असून मागील वर्षी १२३८ लोकांना फेलोशिप देण्यात आली आणि ह्यावर्षी सुरुवातीला मात्र ५० आणि आता २०० जागा हा तुटपुंजा न्याय देवून हजाराहून अधिक लोकांना फेलोशिपचा हक्क नाकारत असून ओबीसी, भटके विमुक्त प्रती असंवेदनशीलता दाखवत आहेत. सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी संविधानिक पद्धतीने आम्ही उपोषण करीत आहोत. ह्या उपोषणासाठी महाराष्ट्रभरातून ५०० हून अधिक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

*प्रमुख मागण्या*

१. महाज्योतीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या "महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) गेल्यावर्षीपर्यंत अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली होती. तीच परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप उपलब्ध करावी.

२. पिएचडीसाठी नोंदणी झालेल्या दिनांकापासून फेलोशिप अदा करण्यात यावी. या मागणी साठी 
ओबीसी (OBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग SBC समुदयातील संशोधक-पालक, महाज्योती कृती समितीचे 
सद्दाम मुजावर, महाज्योती कृती समिती)
अतुल पाटील, (अध्यक्ष, विद्यार्थी संघ टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) यांच्या वतीने उपोषण करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार