उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित


उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित
दि.28/04/2023
उल्हासनगर: दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींना Online दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देशप्राप्त झाले  त्याअनुषंगाने आज दिनांक 28/04/2023 रेाजी महापालिका महासभागृह येथे दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID देण्याबाबत दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये उल्हासनगर क्षेत्रातील मनपा शाळा, खाजगी शाळा, अनुदानीत शाळा, विना अनुदानीत शाळांमधील मुख्यध्यापक तसेच दिव्यांग सेवा संस्थांच्या पदधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मध्ये सुमारे 200 त 250 मुख्यध्यापक व विविध संस्थांचे एन.जी.ओ. उपस्थित होते. श्री. भारत वेखंडे, जिल्हा सम्नवयक, डायट, रहाटोली, तसेच व श्री. नारायण भालेराव यांनी यु.डी.आय.डी. व यु डाईस प्लस बाबत मार्गदार्शन केले आहे. 
या वेळी प्रसिध्द मान्यवरांची ग्रेट भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली या मध्ये अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार विजेते तसेच अंतरराष्ट्रीय पॅरा ऑलोम्पिक्स गेम्स सुर्वण पदक विजेता श्री. अशोक भोईर तसेच डॉ. करूणा लादे, योगगुरु ,डॉ अमोल मोलावदे, श्री सचिन सावंत, दीव्यांग आधार सेवा संस्था, तसेच श्री.राजेश साळवे अपंग संस्था ,शिवकमल प्रतिष्ठान, अध्यक्ष, लार्किन्स रामटेके मैडम, साइंटिस्ट्, डॉ राजु उत्तमानी, प्रेसिडेंट उल्हासनगर डॉक्टर असोसिएशन, उमा, डॉ साधना गायकर, होमियोपैथी तज्ञ मिना फरदे, महिला अध्यक्षा सोहम फाउंडेशन नवीन गायकवाड़, बुद्धभुमी फाउंडेशन, डॉ योगा नाम्बियार, ट्रांसजेंडर कम्युनिटी प्रमुख, शिव लेडवानी समाजसेवक, आनंदा होवाळ, संविधान प्रचारक, हरि चावला, उपाध्यक्ष जय शिवशंकर व्यापारी असोसिएशन सतीश मराठे, ब्लड डोनर कैम्प प्रचारक, शशिकांत दायमा वालधुनी नदी संवर्धन समिती, अशोक खाटूजा, थैलेसीमिया फाउंडेशन, मिरा सपकाळे अध्यक्षा असंगठित महिला कामगार संघटन, कुमारी भानु पाल, समाजसेविका,श्री हळदे, समाजसेवक उपस्थित होते.
सदर कार्यकमास मा. श्री. जमीर लेंगरेकर, अतिरीक्त आयुक्त (शहर), मा.डॉ. सुभाष जाधव, उप-आयुक्त (दि.क.यो.वि.), मा. श्री.अशोक नाईकवाडे, उप-आयुक्त् (मुख्यालय),  मा. श्री. किरण भिलारे, मुख्य लेखा अधिकारी, मा. श्री. शरद देशमुख, मुख्य लेखा परिक्षण, श्री.  बाळु नेटके, मुख्य अग्निशमन अधिकारी, श्री. अशोक मोरे, प्रशासन अधिकारी, श्री. मनिष हिवरे, सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी , श्रीम. छाया डागळे, जनसंपर्क अधिकारी,      श्री. शांताराम चौधरी, क्रिडा अधिकारी, श्री. राजा बुलानी, विधी अधिकारी सह इतर अधिकारी उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वी रित्या पारपाडण्याकरीता दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागातील अधिकारी श्री राजेश घनघाव  , संगीता लहाने  आणि कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार