कुस्तीपटूंच्या भेटीसाठी प्रियांका गांधी जंतरमंतर वर आंदोलना साठी बसलेल्या कुस्तीपटूंसोबत चर्चा

प्रियांका गांधी यांचा कुस्ती पटूंना पाठिंबा,आंदोलनाबाबत चर्चा

कुस्तीपटूंच्या भेटीसाठी प्रियांका गांधी जंतरमंतर वर
आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंसोबत चर्चा
दिल्ली : 
बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन
 भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंची काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी महिला कुस्तीपटूंना भावना अनावर झाल्याने प्रियांका यांनी मायेने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत त्यांना धीर दिला. जंतरमंतर वर बसलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाचा सातवा दिवस आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. यावेळी प्रियांका यांनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन