जगाला युद्ध नको बुद्ध हवा - आनंदराज आंबेडकर

जगाला युद्ध नको बुद्ध हवा - आनंदराज आंबेडकर 
उल्हासनगर (अशोक शिरसाट) आज एक रिक्षावाला माणूस मुख्यमंत्री होते, एक चाय वाला देशाचा पंतप्रधान होतो ते फक्त भारतीय संविधानामुळे , भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा जगातील शांतता प्रिय आहे म्हणून आजही जगाला युद्ध नको बुद्ध हवा असे उदगार रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर, हे उल्हासनगरात एका बाल श्रामणेर शिबिरात उद् घाटन सोहळ्यात बोलत होते तसेच उल्हासनगर- २ मध्ये एम, आय ,डी ,सी, रोड, हनुमान नगर, येथे अखिल भारतीय भिक्खुसंघ अंतर्गत यशोधरा फाऊंडेशन ट्रस्ट च्यावतीने पाच दिवसाचे बाल श्रामणेर, शिबिर आणि भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण उद्घाटन सोहळ्याचे आयोजन भिक्खु महामोग्गलायन यांनी केले होते तसेच उल्हासनगर - २ मध्ये हनुमान नगर येथे यशोधरा बुद्ध विहार फाउंडेशन या ठिकाणी जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुतीचे अनावरण उद्घाटन सोहळा हा इंदूमिल प्रणेते आनंदराज आंबेडकर, मनीषाताई आनंदराज आंबेडकर, आणि पुज्य भंतेजी धम्मप्रिय, यांच्या हस्ते झाले तसेच या बाल श्रामणेर शिबिराच्या कार्यक्रमात भंन्ते वप्प, भंन्ते धम्मपाल, भंन्ते सदानंद, भंन्ते काश्यप, भंन्ते विनयप्रिय, भंन्ते सारीपुत्त, भंन्ते धम्मरत्न, भंन्ते संघरत्न, भिक्खुनी शासन ज्योती, भंन्ते गुणरत्न, भंन्ते ब्रम्हरत्न, भंन्ते नामानंद , यांच्यासह यशोधरा फाऊंडेशन ट्रस्ट च्या आशा भोईर, इंदुबाई सोनवणे, सतिश गायकवाड, धर्माजी बनसोडे, संतोष जाधव, अक्षदा वानखेडे, पत्रकार शिवाजी म्हस्के, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष बाळासाहेब अहिरे, यांच्या झासह आदी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदेडच्या लताताई नागनाथ शिंदे यांनी केले.             .           संपादक हरी आल्हट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप