उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्राण किटचे वितरण

उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्राण किटचे वितरण 
दि १ नोव्हेंबर २००५ नंतर महानगरपालिकेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना आज मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते प्राण किटचे वितरण करण्यात आले.
दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केली होती. शासनाच्या धर्तीवर उल्हासनगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करुन अशा कर्मचाऱ्यांना NSDL Protean सोबत करार करून PRAN(Permanent Retirement Account Number) प्राप्त करुन घेतले. आता या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतनातून कपात होणाऱ्या कर्मचारी अंशदान व मनपा अंशदानाच्या रक्कमा थेट शेअर बाजारामध्ये गुंतवल्या जाणार आहेत. यातून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या व्याजाचा परतावा हा भविष्य निर्वाह निधीपेक्षा जास्त राहिल, असे आयुक्त अजिज शेख यांनी यावेळी सांगितले.
.                   संपादक हरी आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार