पोस्ट्स

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

मामा आमच्या आईच्या अस्थी मिळतील ना ? पुणे: जगभरात करोनाने थैमान घातलं आहे.या आजाराने आपल्या जवळच्या लोकांना कायमचं गामावल्याने अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.पुणे शहरातही अनेक स्मशानभूमीत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्याचे भीषण चित्र पाहण्यास मिळत आहे.या स्मशानभूमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दररोज अनेक अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.असाच एक अनुभव कैलास स्मशानभूमीत काम करणारे ललित जाधव यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सांगितलाय.अस्थींमुळे करोना होण्याच्या भीतीने नातेवाईक येत नसल्याने पालिका कर्मचारीच करतायत अस्थी विसर्जन “संध्याकाळची वेळ होती,आम्ही सर्व जण स्मशानात आणले जाणारे मृतदेह विद्युत दाहिनीजवळ एक एक करून ठेवत होतो.तेवढ्यात स्मशानभूमीत एक रुग्णवाहिका दाखल झाली.त्यातील बॉडी आम्ही खाली घेतली.त्या रुग्णवाहिकेच्या बाजूला एक आलिशान चार चाकी गाडी येऊन थांबली.त्या गाडीतून दोन मुलं उतरली.त्यांचं वय साधारण आठ ते दहा वर्ष असेल.ते इकडे तिकडे पाहत होत.अचानक माझ्याकडे येऊन म्हणाले, ही माझी आई आहे.आमच्या मागे आता कोणी नाही.आहो मामा आमच्या आईच्या अस्थी मिळतील ना ओ?,असं म्हणत ती दोन्ही मूलं ढसाढसा रडू लागली.त्यांच रडणं पाहुण मला ही रडू आवरल नाही,” असं जाधव यांनी सांगितलं.“त्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन आता यांच्याशी काय बोलाव सुचत नव्हतं.बाळांनो रडू नका,त्यांना पाणी आणून दिले.दोघांना शांत केले आणि म्हटलं, बाळांनो हो मी तुम्हाला अस्थी देतो,” असं त्या मुलांना सांगितल्याचं जाधव म्हणाले.“आजवर अनेकांचा इथे आक्रोश पाहिला.पण या मुलाकडे पाहून आता याचं कसं होणार हाच विचार मनात घोंघावत राहिला

इमेज

लाल, पिवळ्या, हिरव्या स्टीकरचा आदेश मुंबई पोलिसांकडून रद्द मुंबई ,,: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोठा गाजावाजा करून सुरू केलेली 'कलर कोड' नियम मागे घेण्यात आले आहे. तसे पत्रकच मुंबई पोलिस दलातील मुख्य नियंत्रण कक्षातून काढण्यात आले आहे. हे नियम कोणत़्या कारणास्तव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला हे अद्याप कळू शकले नसले. तरी या नियमाबाबत सुरवातीपासूनच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाले होते.*प्रिय मुंबईकरांनो*लाल, पिवळा, हिरवा रंग वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.विशेष म्हणजे हे स्टिकर घरातच बनवून लावण्याचे आदेश दिल्याने अनेक अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहन चालकांनी ही आपल्या गाडीला हे स्टिकर लावल्याचे तपासा दरम्यान निर्माण निदर्शनास आले.नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पध्दत पोलिसांसाठीच तापदायक बनल्याने अवघ्या सात दिवसांत कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड देण्यात आला होते. सध्या जिल्हा बंदीचे नियम असल्याने पोलिसांनी पुन्हा ई-पास सेवा E-Pass सुरू केली आहे. त्यात ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल एमर्जन्सी वगळता कुणालाही ई-पास दिले जाणार नाही. मागच्या लाँकडाऊनमध्येही ई-पासमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. काही ठिकाणी ई- पासचा काळाबाजार झाल्याचेही उघडकीस आले होते.

इमेज

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे मुंबई, २४ /४/२०२१ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरण आणि त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला.परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

इमेज