लाल, पिवळ्या, हिरव्या स्टीकरचा आदेश मुंबई पोलिसांकडून रद्द मुंबई ,,: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोठा गाजावाजा करून सुरू केलेली 'कलर कोड' नियम मागे घेण्यात आले आहे. तसे पत्रकच मुंबई पोलिस दलातील मुख्य नियंत्रण कक्षातून काढण्यात आले आहे. हे नियम कोणत़्या कारणास्तव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला हे अद्याप कळू शकले नसले. तरी या नियमाबाबत सुरवातीपासूनच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाले होते.*प्रिय मुंबईकरांनो*लाल, पिवळा, हिरवा रंग वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.विशेष म्हणजे हे स्टिकर घरातच बनवून लावण्याचे आदेश दिल्याने अनेक अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहन चालकांनी ही आपल्या गाडीला हे स्टिकर लावल्याचे तपासा दरम्यान निर्माण निदर्शनास आले.नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पध्दत पोलिसांसाठीच तापदायक बनल्याने अवघ्या सात दिवसांत कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड देण्यात आला होते. सध्या जिल्हा बंदीचे नियम असल्याने पोलिसांनी पुन्हा ई-पास सेवा E-Pass सुरू केली आहे. त्यात ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल एमर्जन्सी वगळता कुणालाही ई-पास दिले जाणार नाही. मागच्या लाँकडाऊनमध्येही ई-पासमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. काही ठिकाणी ई- पासचा काळाबाजार झाल्याचेही उघडकीस आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार