माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे मुंबई, २४ /४/२०२१ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरण आणि त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला.परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार