पोस्ट्स
१००० कोविड रुग्णाना भोजन करवुन लग्न कल्याण ग्रामीण मधील म्हारळ गावचे रहिवासी उल्हास नदी बचाव कृती समितीचे सदस्य उमाई पुत्र समाजसेवक चि. निकेत व्यवहारे आणि आरती शिंदे यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा दिनांक ६ जून रोजी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर पारनेर अहमदनगर येथे आमदार निलेशजी लंके यांचा आशीर्वादाने पार पडला दोन्ही कुटुंबाने लग्नं मध्ये इतर वायफळ खर्च न करता १ हजार कोरोना रुग्णांना जेवणाची पंगत आणि अत्यावश्यक वस्तु चे वाटप केलं आणि संपुर्ण महाराष्ट्रात या विवाह सोहळाची चर्चा सुरू आहे. आमदार लंके साहेब यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन दोन्ही नवविवाहित कुटुंबातील दांपत्यनी एक ऐतहासिक लग्न सोहळा पार पडला वेळी निलेश लंके साहेब, श्रीकांत चौरे साहेब, काका देवराम व्यवहारे, सखाराम व्यवहारे,स्व.रोहित भाई भोईर प्रतिष्ठान चे सभासद उपस्थीत होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिनांक ७ जून २०२१ उल्हासनगर बाळा साहेब क्रीडा संकुल, स्मारक आणि रस्ते विकासा साठीशासनाकडून ७४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंंजूर कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांची ग्वाहीउल्हासनगर शहरात बाळासाहेब ठाकरे यांंचे अद्यावत क्रीडा संकूलन, भव्य स्मारक आणि शहरातील रस्ते यासाठी शासनाकडून ७४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कल्याण लोकसभा खा. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परीषद मध्ये दिली.उल्हासनगर हे अती दाटीवाटी लोकसंख्या असलेले शहर. त्यात व्यापाराशी संबंधित.या शहरातील नागरीकांना कला संंस्कृती बाबत स्वारस्य नाही.अश्या परस्थीत शिवसेनेच्या वतीने क्रिडा कला जोपसण्या साठी व्हि.टी .सी . ग्राऊण्ड येथे क्रीडा संकूलन उभारण्यात आले. निधी कमी पडला.नाव बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकूलन ठेवण्यात आले.५० कोटीचा निधी खर्च झाला.पण काम आर्धवट. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा विषय मंजूर करण्यात आला.त्या सोबत शहरातील मुख्यरूप रस्ते.या साठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरच्या विकास कामासाठी ७४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. अशी माहिती खा.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी शहराच्या महापौर लिलाबाई आशान, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,सभागृह नेता भरत गंगोत्री,उप जिल्हाध्यक्ष गोपालजी लांडगे, धंनजय बोडारे,चंद्रकांत बोडारे आदी मान्यवर उपस्थित होते
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उल्हासनगर मे ४० साल से चल रही अंध हितकारी संस्था जिसके संस्थापक जगदीश पटेल उनकी तरफ से दिवा से लेकर वांगणी तक जितने भी अंध नागरिक है उनको संस्था की माध्यम से लॉक डाऊन कि महामारी मे राशन दिया जाता है जब से लॉक डाऊन शुरू हूवा तब से अभि तक हजारो अंध अपंग लोगो को संस्था की तरफ से मदत मिली है ऐसी जाणकारी अंध नागरिक ने दी है. यह मदत दानविर लोगो की तरफ से अती है ऐसी जाणकारी अंध हितकारी संस्था के संस्थापक जगदीश पटेल इन्होने दि है...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राज्य शासनाच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात येत असून प्रत्येक ठिकाणच्या कोविड स्थितीनुसार ठिकाणांची वेगवेगळ्या टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश टप्पा २ मध्ये करण्यात आला असून त्यानुसार जिल्हाधिका-यांनी सवलती जाहीर केल्या आहेत.१० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकांचे क्षेत्र हे तीन स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून यापुढे समजण्यात येतील. तर मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे एक एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक समजण्यात येतील.तसंच प्रत्येक प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सीजनचा वापर होणारी बेडसंख्या विचारात घेऊन त्यानुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्यातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये कोविड पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सीजन बेडस् ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात रूग्णांनी भरलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार या क्षेत्रामध्ये काही निर्बंध शिथील करण्याबाबत सूट घोषित करण्यात आली होती.प्रत्येक स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामद्ये कोविड पॉझिटिव्हीटी दर विचारात घेऊन ५ स्तर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये असणा-या चार स्वतंत्र प्रशासकीय घटकांमध्ये पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेडची उपलब्धता लक्षात घेऊन ते कोणत्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहेत याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास निर्णय घेणं आवश्यक आहे.काही महापालिका क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हीटी दर हा नमूद स्तराच्या बॉर्डर लाईनवर असल्याचं दिसून आलं आहे. त्याअनुषंगाने ठाणे महापालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रास स्तर २, नवी मुंबई महापालिका क्षेत्रास स्तर २ तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रास स्तर ३ आणि जिल्ह्यातील उर्वरीत भागातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रास स्तर ३ चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काही निर्बंध शिथील केल्याचं जाहीर केलं आहे. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारी संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमागृह नाट्यगृहं बंद राहीतल. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. मात्र ४ नंतर आणि शनिवारी आणि रविवारी फक्त पार्सल सर्व्हीस उपलब्ध राहील.उपनगरीय लोकल वाहतुकीबाबत मुंबई महापालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. सार्वजनिक ठिकाणं, मैदाने, सायकलिंगसाठी सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी राहील. खाजगी कार्यालयं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. क्रीडा सकाळी ५ पासून सकाळी ९ पर्यंत तसंच संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.चित्रीकरण बबलमध्ये संध्याकाळी ४ पर्यंत सुरू ठेवता येईल. सामाजिक मेळावे, सांस्कृतिक, करमणूक ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील, अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल. बैठका, स्थानिक संस्थांच्या निवडणुका सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेनं सुरू राहील. बांधकामासाटी केवळ ऑनसाईट मजूर राहणा-या किंवा ४ पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर सुरू राहील. जमावबंदी संध्याकाळी ५ पर्यंत तर संचारबंदी संध्याकाळी ५ नंतर लागू राहील.व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर्स संध्याकाळी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. परंतु पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसंच वातानुकुलित यंत्राचा वापर करता येणार नाही.सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के बैठक क्षमतेनं सुरू राहील. खाजगी कार, टॅक्सी, बस यासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास ई-पास लागेल. हे आदेश जिल्ह्यातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांसाठी आहेत.ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रांमध्ये संबंधित महापालिका आयुक्त यांनी पारीत केलेले आदेश त्या त्या महापालिका क्षेत्रामध्ये लागू राहतील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स