राज्य शासनाच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात येत असून प्रत्येक ठिकाणच्या कोविड स्थितीनुसार ठिकाणांची वेगवेगळ्या टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश टप्पा २ मध्ये करण्यात आला असून त्यानुसार जिल्हाधिका-यांनी सवलती जाहीर केल्या आहेत.१० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकांचे क्षेत्र हे तीन स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून यापुढे समजण्यात येतील. तर मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे एक एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक समजण्यात येतील.तसंच प्रत्येक प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सीजनचा वापर होणारी बेडसंख्या विचारात घेऊन त्यानुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्यातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये कोविड पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सीजन बेडस् ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात रूग्णांनी भरलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार या क्षेत्रामध्ये काही निर्बंध शिथील करण्याबाबत सूट घोषित करण्यात आली होती.प्रत्येक स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामद्ये कोविड पॉझिटिव्हीटी दर विचारात घेऊन ५ स्तर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये असणा-या चार स्वतंत्र प्रशासकीय घटकांमध्ये पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेडची उपलब्धता लक्षात घेऊन ते कोणत्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहेत याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास निर्णय घेणं आवश्यक आहे.काही महापालिका क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हीटी दर हा नमूद स्तराच्या बॉर्डर लाईनवर असल्याचं दिसून आलं आहे. त्याअनुषंगाने ठाणे महापालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रास स्तर २, नवी मुंबई महापालिका क्षेत्रास स्तर २ तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रास स्तर ३ आणि जिल्ह्यातील उर्वरीत भागातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रास स्तर ३ चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काही निर्बंध शिथील केल्याचं जाहीर केलं आहे. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारी संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमागृह नाट्यगृहं बंद राहीतल. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. मात्र ४ नंतर आणि शनिवारी आणि रविवारी फक्त पार्सल सर्व्हीस उपलब्ध राहील.उपनगरीय लोकल वाहतुकीबाबत मुंबई महापालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. सार्वजनिक ठिकाणं, मैदाने, सायकलिंगसाठी सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी राहील. खाजगी कार्यालयं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. क्रीडा सकाळी ५ पासून सकाळी ९ पर्यंत तसंच संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.चित्रीकरण बबलमध्ये संध्याकाळी ४ पर्यंत सुरू ठेवता येईल. सामाजिक मेळावे, सांस्कृतिक, करमणूक ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील. लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील, अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल. बैठका, स्थानिक संस्थांच्या निवडणुका सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेनं सुरू राहील. बांधकामासाटी केवळ ऑनसाईट मजूर राहणा-या किंवा ४ पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर सुरू राहील. जमावबंदी संध्याकाळी ५ पर्यंत तर संचारबंदी संध्याकाळी ५ नंतर लागू राहील.व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर्स संध्याकाळी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. परंतु पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसंच वातानुकुलित यंत्राचा वापर करता येणार नाही.सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के बैठक क्षमतेनं सुरू राहील. खाजगी कार, टॅक्सी, बस यासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास ई-पास लागेल. हे आदेश जिल्ह्यातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांसाठी आहेत.ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रांमध्ये संबंधित महापालिका आयुक्त यांनी पारीत केलेले आदेश त्या त्या महापालिका क्षेत्रामध्ये लागू राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार