पोस्ट्स

कळवा मुंब्रा दिवा व कल्याण रेल्वे स्थानकाचा डी आर यु सी सी कमिटी सदस्य सुभाष साळुंके यांनी केला पाहणी दौराकल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे अंबरनाथचे नगरसेवक व मध्य रेल्वे च्या DRUCC समिती सदस्य सुभाष नारायण साळुंके यांनी मध्य रेल्वेच्या कल्याण, कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकाच्या स्टेशन प्रबंधक व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी दौरा करत स्थानकातील विविध समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर स्थानकातील स्टेशन प्रबंधक व अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार घेतलीया बैठकीत प्रवाशांना होणाऱ्या समस्या व गैरसोयी तातडीने सोडविण्यात यावे असे सुभाष साळुंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले तसेच अधिकारी वर्गाकडून रेल्वे स्टेशन व प्लॅटफॉर्म बाबत अडचणी समजावून घेतल्याया वेळीकल्याण स्टेशन प्रबंधक अनुपमकुमार जैन उपप्रबंधक जे एन झा, RPF इन्चार्ज बामणे साहेब खासदार रेल्वे प्रवाशी समन्वय समितीचे रविंद्र उतेकर कळवा स्टेशन प्रबंधक विनोद के खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे सदस्य विजय देसाई, श्रीमती निर्मला ठाकुर .आशिष मांजरेकर तसेचमुंब्रा स्टेशन प्रबंधक प्रकाश चाचारिया खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती चे किशोर मोहिते कासार, राजकुमार जमखंडीकर दिवा रेल्वे स्टेशन प्रबंधक मनोज कुमार गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर,पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते कल्याण,कळवा,मुंब्रा,दिवा रेल्वे स्टेशनमध्ये आवश्यक सोयीसुविधा निर्माण करणे,पुरेशी स्वच्छतागृहे व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.तसेच रेल्वे स्टेशन परिसर, प्लॅटफॉमवर असलेली अस्वच्छता,दुर्गंधीयुक्त व कचरामुक्त परिसर करणे,रेल्वे प्रवाशांना योग्य सोयी सुविधा पुरविणे, महिला प्रवाशांच्या सुरक्षितेकरिता प्रत्येक स्टेशनवर महिला डब्बा लगत महिला किंवा पुरुष कॉन्स्टेबलची गस्त वाढविणे व गुन्ह्याचे प्रमाण रोखण्याकरिता आरपीएफ सुरक्षाबलात वाढ करण्याची गरज असल्याचे ही सुभाष साळुंके यांनी सांगितले. पाहणी केलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक यांना माहिती देऊन अवगत केले जाणार आहे.

इमेज

उल्हासनगर येथे प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष द्या - पत्रकार सुरक्षा समितीची मागणी उल्हासनगर शहरात शासकीय निमशासकिय कार्यालय आहेत या कार्यालया कडून कोणती ही प्रेस नोट अथवा माहिती मिळत नाही तर उल्हासनगर महापालिकेत पत्रकार कक्ष असून शहरातील महसूल विभागाच्या सर्व घडामोडी प्रांत कार्यालयातुन होतात मात्र त्या ही कार्यालयातुन पत्रकाराना योग्य माहिती मिळत नाही तसेच तहसिलदार कार्यालयाची नवीन इमारत तयार आहे प्रांत कार्यालयाची सुध्दा इमारत तयार झाली आहे या दोन्ही कार्यालया पैकी एका कार्यालयात पत्रकार कक्ष त्या ठिकाणी द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई यांनी उल्हासनगर येथे उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना निवेदन देण्यात आले तसेच या निवेदना प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई , उपाध्यक्ष सलिम मंसुरी , महासचिव सुरेश जगताप , सदस्य अशोक एफ शिरसाट , विजय सिंग , हरि आल्हाट, यांच्यासह आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते

इमेज

*ओबीसींची जनगणना करण्यात सरकारला रस नाही* : डॉ.सुरेश माने ठाणे (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जी काही सरकारं आली त्यापैकी कोणालाही ओबीसी समाजाची जनगणना करावी असे वाटत नाही, त्यांची ओटब्यांक तूटण्याची त्यांना भीती वाटते, देशातील जनावरांची जनगणना होत असते परंतु ओबीसींची होत नाही हा मोठा गहन प्रश्न आहे, असे प्रतिपादन फूलेशाहुआंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत घटनातज्ञ डॉ.ॲड. सुरेश माने यांनी केले, नवनिर्माण बहुजन फोरमच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश माने बोलत होते, डॉ.आंबेडकर रोड येथील बुद्ध विहार हॉल येथे आयोजित या आरक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते धनाजी सुरोसे होते,डॉ.माने मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेल्या अनुसुचित जाती जमाती आरक्षण मंत्री गट समिती चे एससी सदस्यांनी समितीचे राजिनामे द्यायला हवेत, त्यांना विचारले जात नसेल आणि गृहीत धरून अजीत पवार परस्पर पदोन्नती रद्द करण्याची जी आर काढतात तर तूम्ही पदावर राहताच कशाला असा ही सवाल त्यांनी उपस्थित केला, मराठा आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा संशोधनात्मक इतिहास सांगून मोठ्या प्रमाणात होणार्या शेतकरी आत्महत्या त्यांची कारणे, मराठा आरक्षणाची गरज या विषयावर सखोल मार्गदर्शन कायदेतज्ज्ञ डॉ.सुरेश माने यांनी केले, ओबीसी नेते धनाजी सुरोसे नवनिर्माण बहुजन फोरमचा उद्देश सांगताना यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजामध्ये आपला हक्क आणि मौलिक अधिकार या बाबत मोठी उदासिनता दिसून येते, हि जनजागृती करण्यासाठी फोरमच्या माध्यमातून ओबीसी एससी एसटी मायनोरिटी भटक्या विमुक्त समाजाला जोडण्याचे काम हाती घेतले आहे,गेली दहा पंधरा वर्षांपासून ठाणे शहरातील फूले शाहू डॉ आंबेडकरी चळवळीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे,नविन तरुणांना पुढे आणले पाहिजे, चळवळीतील कार्यकर्ते चळवळीला पोषक नसलेल्या राजकीय पुढार्यांच्या मागे वेळ वाया घालवत आहेत, बहुजन समाजातील सर्व घटकांना एकत्र करून भविष्यातील सामाजिक, राजकीय घडामोडीतून बहुजन चळवळीच्या हातात काही चांगलं यश यायला हवे, त्यासाठी हा फोरम काम करणार आहे,डॉ.सुरेश माने यांनी दिप प्रज्वलन करून परिषदेला सुरुवात केली, जेष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर, ओबीसी विचारवंत राजाराम ढोलम, डॉ.विजय पवार यांनीही यावेळी आपले विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते राहुल कांबळे यांनी केले, उपस्थित जेष्ठ मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,या आरक्षण परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रक जयंत किर्तने, ॲड.सचिन कांबळे, जस्टिन राजू, बालाजी मसुरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

इमेज

200 दिव्यांगों को वेक्सीनेशन के लिये मुफ्त परिवहन सेवा...आज मंगलवार 22 जुन को।सेंचुरी रेयान स्कूल में दिव्यांग बंधुओं के लिए विशेष वेक्सीनेशन टीकाकरण सत्र उल्हासनगर मनपा द्वारा आयोजित किया गया, टीका लगवाना चाहने वाले 200 दिव्यांग भाई बहनों के लिये स्वयंसेवक के साथ उनको लाने ले जाने की मुफ्त परिवहन व्यवस्था और अन्य सहायता आईआईएफएल संस्था, सोहम फाउंडेशन एनजीओ टिम और उल्हासनगर के समाजसेवी सोनु विशनानी द्वारा की गई।

इमेज

*पदोन्नती मधील आरक्षण मिळवण्यासाठी विविध संघटनेची बैठक संपन्न*( आशा रणखांबे) कल्याण/ ठाणे दि.२१ रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ठाणे जिल्हा, ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ , महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना यांची संयुक्तिक सभा संजय थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह कल्याण येथे संपन्न झाली.

इमेज