कळवा मुंब्रा दिवा व कल्याण रेल्वे स्थानकाचा डी आर यु सी सी कमिटी सदस्य सुभाष साळुंके यांनी केला पाहणी दौराकल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे अंबरनाथचे नगरसेवक व मध्य रेल्वे च्या DRUCC समिती सदस्य सुभाष नारायण साळुंके यांनी मध्य रेल्वेच्या कल्याण, कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकाच्या स्टेशन प्रबंधक व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी दौरा करत स्थानकातील विविध समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर स्थानकातील स्टेशन प्रबंधक व अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार घेतलीया बैठकीत प्रवाशांना होणाऱ्या समस्या व गैरसोयी तातडीने सोडविण्यात यावे असे सुभाष साळुंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले तसेच अधिकारी वर्गाकडून रेल्वे स्टेशन व प्लॅटफॉर्म बाबत अडचणी समजावून घेतल्याया वेळीकल्याण स्टेशन प्रबंधक अनुपमकुमार जैन उपप्रबंधक जे एन झा, RPF इन्चार्ज बामणे साहेब खासदार रेल्वे प्रवाशी समन्वय समितीचे रविंद्र उतेकर कळवा स्टेशन प्रबंधक विनोद के खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे सदस्य विजय देसाई, श्रीमती निर्मला ठाकुर .आशिष मांजरेकर तसेचमुंब्रा स्टेशन प्रबंधक प्रकाश चाचारिया खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती चे किशोर मोहिते कासार, राजकुमार जमखंडीकर दिवा रेल्वे स्टेशन प्रबंधक मनोज कुमार गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर,पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते कल्याण,कळवा,मुंब्रा,दिवा रेल्वे स्टेशनमध्ये आवश्यक सोयीसुविधा निर्माण करणे,पुरेशी स्वच्छतागृहे व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.तसेच रेल्वे स्टेशन परिसर, प्लॅटफॉमवर असलेली अस्वच्छता,दुर्गंधीयुक्त व कचरामुक्त परिसर करणे,रेल्वे प्रवाशांना योग्य सोयी सुविधा पुरविणे, महिला प्रवाशांच्या सुरक्षितेकरिता प्रत्येक स्टेशनवर महिला डब्बा लगत महिला किंवा पुरुष कॉन्स्टेबलची गस्त वाढविणे व गुन्ह्याचे प्रमाण रोखण्याकरिता आरपीएफ सुरक्षाबलात वाढ करण्याची गरज असल्याचे ही सुभाष साळुंके यांनी सांगितले. पाहणी केलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक यांना माहिती देऊन अवगत केले जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार