उल्हासनगर येथे प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष द्या - पत्रकार सुरक्षा समितीची मागणी उल्हासनगर शहरात शासकीय निमशासकिय कार्यालय आहेत या कार्यालया कडून कोणती ही प्रेस नोट अथवा माहिती मिळत नाही तर उल्हासनगर महापालिकेत पत्रकार कक्ष असून शहरातील महसूल विभागाच्या सर्व घडामोडी प्रांत कार्यालयातुन होतात मात्र त्या ही कार्यालयातुन पत्रकाराना योग्य माहिती मिळत नाही तसेच तहसिलदार कार्यालयाची नवीन इमारत तयार आहे प्रांत कार्यालयाची सुध्दा इमारत तयार झाली आहे या दोन्ही कार्यालया पैकी एका कार्यालयात पत्रकार कक्ष त्या ठिकाणी द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई यांनी उल्हासनगर येथे उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना निवेदन देण्यात आले तसेच या निवेदना प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई , उपाध्यक्ष सलिम मंसुरी , महासचिव सुरेश जगताप , सदस्य अशोक एफ शिरसाट , विजय सिंग , हरि आल्हाट, यांच्यासह आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप