पोस्ट्स

साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून दीपक सोनोने व आबा साठे यांची पद नियुक्ती

इमेज
साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून दीपक सोनोने व आबा साठे यांची पद नियुक्ती .    उल्हासनगर: साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून दीपक सोनोने व आबा साठे यांना दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील महादेव शेलार यांच्या कार्यालयात बातमी जनहितचे संपादक हरी आल्हाट यांच्या आदेशाने तसेच महादेव शेलार, अनिल यादव, रजनीकांत शहा, शैलेंद्र रुपेकर, राकेश मिश्रा, या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोनोने व साठे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

माहेरची साडी' च्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांचा चित्रपट लेक असावी तर अशी'

इमेज
प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी चित्रपटाचा लक्षवेधक ट्रेलर मान्यवरांच्या  उपस्थितीत प्रदर्शित मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो. सुख दुःखाच्या प्रसंगी याच नात्याची सोबत आपल्याला मिळत असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या 'लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांनी सांभाळली आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माहेरची साडी' चित्रपटाच्या अपूर्व यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके ३४ वर्षानंतर 'लेक असावी तर अशी' या चित्रपटाच्या निमित्ताने नात्यातील प्रेमाचे पदर उलगडून दाखविण्यास सज्ज झाले आहेत.  या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.‘लेक असावी तर अशी' चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्येकर

*पडद्यावर येण्याआधीच रसिकांची आवडती झालेली कलर्स मराठीची आणखी एक मालिका सुख कळले

इमेज
*पडद्यावर येण्याआधीच रसिकांची आवडती झालेली कलर्स मराठीची आणखी एक मालिका सुख कळले   कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वा.    मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर  वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका आपल्या मायबाप रसिकांच्या भेटीला आणतेय.  या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला भरत जाधव, सरिता जाधव, आदेश बांदेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांच्यासोबत मजेदार खेळही खेळण्यात आले.  आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’  सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला

यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, नाट्य समीक्षक, लेखक अरूण घाडीगावकर यांना जाहीर

यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, नाट्य समीक्षक, लेखक अरूण घाडीगावकर यांना जाहीर     मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, नाट्यसमीक्षक आणि लेखक अरूण घाडीगावकर यांना जाहीर झाला आहे. १९६८ साली नरेंद्र बल्लाळ यांच्या 'नवल रंगभूमी'मध्ये त्यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळत नाटकांत भूमिकाही केल्या. मराठी साहित्य विषयात, प्रथम वर्गात एम्. ए. करून, आयडीबीआय बँकेत अधिकारपदाची नोकरी सांभाळून त्यांनी साप्ताहिक 'लोकप्रभा'मधून 'रंगभूमी' हे नाट्यप्रयोग परीक्षणाचं सदर तब्बल २४ वर्षं सलगपणे लिहिलं. 'भरतशास्र' सारख्या नाट्यविषयाला वाहिलेल्या मासिकाचं उपसंपादक आणि संपादकपद त्यांनी भूषविलेलं आहे. 'दीपावली स्पंदन'सारख्या दिवाळी विशेषांकाच्या संपादनात सलग तीन वर्षं 'सर्वोत्कृष्ट दिवाळी अंका'ची पारितोषिकंही त्यांना प्राप्त झाली आहेत. रंगभूमीवरील किश्श्यांची त्यांनी लिहिलेली 'रंगप्रसंग' आणि 'प्रसंगरंग' ही दोन्ही पुस्तकं वाचकप्रिय ठरलेली आहेत. आत्मचरित्रांसाठी त्यांनी केलेली शब्दांकनही गाजलेली आहेत.