यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, नाट्य समीक्षक, लेखक अरूण घाडीगावकर यांना जाहीर

यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, नाट्य समीक्षक, लेखक अरूण घाडीगावकर यांना जाहीर 
 मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर
यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, नाट्यसमीक्षक आणि लेखक अरूण घाडीगावकर यांना जाहीर झाला आहे. १९६८ साली नरेंद्र बल्लाळ यांच्या 'नवल रंगभूमी'मध्ये त्यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळत नाटकांत भूमिकाही केल्या. मराठी साहित्य विषयात, प्रथम वर्गात एम्. ए. करून, आयडीबीआय बँकेत अधिकारपदाची नोकरी सांभाळून त्यांनी साप्ताहिक 'लोकप्रभा'मधून 'रंगभूमी' हे नाट्यप्रयोग परीक्षणाचं सदर तब्बल २४ वर्षं सलगपणे लिहिलं. 'भरतशास्र' सारख्या नाट्यविषयाला वाहिलेल्या मासिकाचं उपसंपादक आणि संपादकपद त्यांनी भूषविलेलं आहे. 'दीपावली स्पंदन'सारख्या दिवाळी विशेषांकाच्या संपादनात सलग तीन वर्षं 'सर्वोत्कृष्ट दिवाळी अंका'ची पारितोषिकंही त्यांना प्राप्त झाली आहेत. रंगभूमीवरील किश्श्यांची त्यांनी लिहिलेली 'रंगप्रसंग' आणि 'प्रसंगरंग' ही दोन्ही पुस्तकं वाचकप्रिय ठरलेली आहेत. आत्मचरित्रांसाठी त्यांनी केलेली शब्दांकनही गाजलेली आहेत. अलीकडेच त्यांनी संपादित केलेली 'भक्ती पंथेचि जावे' (हे भक्ती बर्वेंच्या लेखांचं संपादन) आणि 'या मंडळी सादर करूया' (हे जे. जे. तील कलावंत मंडळींच्या अनुभवावरील लेखांचं पुस्तक) ही प्रकाशित झालेली आहेत. मान्यवर लेखकांच्या पुस्तकांनाही त्यांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रं, नियतकालिकं, पुस्तकांमधून त्यांचे रंगभूमी विषयावरील लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे.
अशा *अरूण घाडीगावकर* यांना यंदाचा *प्रेरणा गौरव पुरस्कार* रविवार, दिनांक *५ मे २०२४* रोजी *प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात* होणाऱ्या 'बाल नाट्य महोत्सवा'त ज्येष्ठ अभिनेते, नाटककार, महाकादंबरीकार *श्री. अशोक समेळ यांच्या शुभहस्ते* प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सौ. संजीवनी समेळ, सौ. ऊर्मिला लोटके व श्री. सतीश लोटके यांचीही सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप