पत्रकार विजयकुमार सोनवणे *यांच्या कुटूंबास पन्नास लाख रुपये देण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी* सोलापूर -जगात कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद सोलापूर येथे मोठया प्रमाणात उमटले असून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन आपल्या परीने कोरोना रोगाला रोखून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असून कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात येत आहे दैनिक सकाळ वृत्तसमूहाचे सोलापूर प्रतिनिधी विजयकुमार सोनवणे हे कोरोना रोगाबाबत आपला जीव धोक्यात घालून राष्ट्रीय कर्तव्य म्हूणन सर्व सामान्य माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती व वृत्तांकन करत असताना कोरोना च्या संक्रमण काळात दिनांक 20/7/2020 रोजी सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात मयत झाले असून त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून घरातील कर्तापुरुष गेल्याने कुटूंबाची अतोनात हानी झालेली आहे कोरोना रोग जीवघेणा असून या बाबत पत्रकारांना भरीव आर्थिक तरतूद करावी म्हूणन पत्रकार सुरक्षा समिती वतीने 27 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन मागणी करण्यात आली होती *पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणी मुख्यमंत्री यांनी मान्य करून कोरोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाल्यास पन्नास लाख रुपये विमा मंजूर केला होता* दैनिक सकाळ सारख्या महाराष्ट्र मधील अनुभवी व लोकमाणसाची जाण असणाऱ्या वृत्तसमूहातील पत्रकाराचा कोरोना काळात मृत्यू होणे ही बाब खूपच वेदनादायी व दुर्दैवी घटना असून एका जेष्ठ व प्रामाणिक पत्रकाराचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबाची होणारी परवड याबाबत मा मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष घालून सोनवणे कुटूंबास पन्नास लाख रुपयांची भरघोस मदत करावी व पत्रकारांच्या मनातील शंका व भय करून पत्रकारांच्या मनातील राज्य सरकार बद्दल ची आदराची भावना दृढ करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार