उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन 
6 तासांत रुग्णवाहिका आली नाही रुग्णाने सोडले प्राण
जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.      
रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर फोन केला जातो. त्यानंतर काही वेळेतच रुग्णवाहिका येत असल्याचा दावा केला जातो. परंतु उल्हासनगरमध्ये वेगळाच प्रकार घडला. अत्यवस्थ असलेल्या रुग्णास नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु एक तास झाला, दोन तास झाले तरी रुग्णवाहिका आली नाही. फोन केल्यावर सहा तास झाल्यावरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर चिंताजनक प्रकृती असलेल्या त्या रुग्णाने प्राण सोडला. या प्रकरणात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले.                                        
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. मध्यवर्ती रुग्णालयात प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णावर योग्य उपचार झाले नाहीत आणि त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल ६ तास सरकारी रुग्णवाहिका आली नाही, याबाबत ठापका त्यांच्यावर ठेवण्यात आला. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर डॉक्टर बनसोडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले.

असा घडली होती घटना…
उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील हर्षवर्धन नगरमध्ये राहणारे राहुल इंधाते यांना २२ जानेवारी रोजी मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खालावत असल्याने मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला होता. त्यासाठी त्यांनी दुपारी २ वाजता नातेवाईकांनी सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. पण रात्रीचे ८ वाजले तरी सरकारी रुग्णवाहिका आली नाही. अखेर रात्री ८ वाजता राहुल इंधाते यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुल यांच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णवाहिकेने नेतो, असे म्हटल्यावर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला परवानगी नाकारत डिस्चार्ज न दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.      

याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या ३ डॉक्टरांना मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रमुख असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची दखल घेत आरोग्य सेवा आयुक्तालयाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत