उल्हासनगर महानगरपालिका स्थायी समितीची निवडणूक शिवसेनेचे विजय पाटील एका मताने विजय

स्थायीसमीती निवडणूक, 
   भाजपा विरुध्द भाजप रंगतदार सामन्यात शिवसेनेचा विजय !!!
   - उल्हासनगर महापालिका स्थायीसमीती सभापती पदाच्या आज पार पडलेल्या निवडणूकीत भाजपा विरुध्द भाजप असा रंगतदार सामान्यात शिवसेना महाआघडी पुरस्कृत भाजपचे उमेद्ववार विजय पाटील हे एका मताने विजयी झाले. या निवडणूकीत सेनेने भाजपाला धक्का देत.हा विजय मिळवल्याची चर्चा शहरात होत आहे.
    उल्हासनगर महापालिका स्थायीसमीती सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. गत सोमवारी या पदासाठी उमेद्ववारी आर्ज दाखल करण्यात आले होते.शहरात शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपा कडे संख्या बळ जास्त असल्याने स्थायीसमीती सभापती पदी भाजपाचा उमेद्ववार निवडूण येणार असे वाटत असतांनाच मंगळवारी मोठी राजकीय घडामोड झाली.भाजपाचे डाँ. प्रकाश नाआथाणी यांनी आपल्या स्थायीसमीती सदस्य पदाचा राजिनामा दिला. त्यामुळे भाजपाची संख्या ८ झाली.भाजप नगरसेवक विजय पाटील यांनी सेनेच्या अनुमतीने उमेद्ववारी आर्ज भरल्याने भाजपाची संख्या ७ झाली.
   ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूकीत भाजपाच्या जया माखिजा यांना ७ तर शिवसेना पुरुस्कृत भाजपा नगरसेवक विजय पाटील यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी नार्वेकर यांनी पाटील यांना विजयी घोषित केलं आहे. आखेर शिवसेनेन भाजपाला धक्का देत स्थायीसमीती आपल्याकडं खेचून आणली असल्याची चर्चा शिवसैनिकां मध्ये रंगली आहे.
 जनहित न्यूज महाराष्ट्र
 एडिटर हरी आल्हाट
 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार