*मा. नगरसेवक–सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने ताडवाडी परिसराला मिळाला शुद्ध पाणीपुरवठा................!* *अ.न.प वॉर्ड क्रमांक ४५ मधील ताडवाडी परिसराला गटारातून bulk कनेक्शन पाण्याचे पाईप गेल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होता याबाबत संबंधित नागरिकांनी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या यांच्याकडे तक्रार केली असता सुभाष साळुंके यांनी म.जी.प्रा. च्या अधिकाऱ्यासह स्वतः पाहणी केली, म.जी.प्रा कडून थेट पाण्याची लाईन टाकून न घेतल्याने नागरिकांनी बी कॅबीन रोड लगतच्या मुख्य लाईन वरून कनेक्शन घेतले होते, सदर लाईन गटारातून गेल्याने गेल्याने दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत होते यामुळे आजार व रोगराईचे प्रमाण वाढले होते, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,**यावर पर्याय म्हणून सुभाष साळुंके यांनी थेट ३ इंची १०० मीटर लांबीची पाईप लाईन मुख्य लाईन वरून म.जी. प्रा कडून टाकून घेतली.**नागरिकांच्या घराजवळ थेट पाईप लाइन टाकल्याने शेकडो नागरिकांना दूषित पाण्या पासून मुक्तता मिळाली असून शुध्द पाणी पुरवठा झाला आहे.**सुभाष साळुंके यांनी नियोजपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे गेले अनेक वर्षाचा तडवाडी परिसरातील नागरिकांचा दूषित पाणी प्रश्न सुटला आहे.* परिसरातील नागरिकांनी *माजी नगरसेवक सुभाष साळुंके* यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार