कोरोना च्या नावाखाली एम. जी. एम. हॉस्पिटलचा भ्रष्टाचार कधी बंद होणार ?

उप संपादक. मयूर भोसले.
श्रीमती सुवर्णा सिताराम सपकाळ रा.चेंबूर येथील रुग्ण गेली 13 दिवस कोरोना च्या नावाखाली एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे 
दिनांक 8/01/2021 पासून covid-19 सस्पेक्ट म्हणून उपचार घेत आहें. या बाबतचे सविस्तर व्रूत्त असे की सदर रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजने अंतर्गत लाभ देणे करता रजिस्टर केले गेले.सदर योजनेअंतर्गत रुग्णास निदान उपचार व औषधे मोफत दिली जातात असे तेथील अधिकारी व आरोग्य मित्रांनी सांगितले. परंतु रुग्णास दिनांक 8/01/21 पासून म्हणजे दवाखान्यात दाखल केल्यापासून आज दिनांक 21/1/2021  पर्यंत रोज यां ना त्या कारणास्तव एम जी एम हॉस्पिटल मधील असलेल्या मेडिकल स्टोअर मधून औषध विकत घेण्यासाठी सांगण्यात येत आहे.सदर बाबतीत विचारणा केली असता एम जे पी जे या योजने अंतर्गत हायर अँटिबायोटिक या औषधांचा समावेश नसतो असे तेथील नर्स व डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रुग्णाची covid-19 ही टेस्ट व आर टी. पी सी आर टेस्ट या दोन्ही निगेटिव्ह आलेल्या आहेत़ व सदर रुग्णास remdicivir 100mg चे सहा इंजेक्शन्स बाहेरून आणण्यास सांगितले. जे की सद्य स्थितीत covid-19 पॉझिटिव रुग्णास उपचार म्हणून दिले जाते. तसेच रुग्णाच्या प्रक्रुती मध्ये कोणता सुधार आहें या बाबत येथील डॉक्टर यांच्याकडून व्यवस्थित सागितले जात नाही.हॉस्पिटल मधील डॉक्टर दुपारी 1 वाजता रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून रुग्णाबाबत माहिती देतील असें सांगण्यात आले. परंतु असा कोणताही प्रकार या हॉस्पिटल मध्ये होत नाही.ज्या रुग्णांना मेडिकल मधून औषधे आणायची असतात फक्त त्यांनाच भेटून औषधे आणण्यास सांगितले जाते. आपला रुग्ण कधी गंभीर आहें तर कधी चांगला आहें असेच सांगण्यात येते.हॉस्पिटल मध्ये रुग्णास भेटण्या साठी मनाई असल्या मुळे आतमधे काय चालले आहें हे कळाला मार्ग नाही. दि. 18/01/2021 रोजी अशीच एक मेडिसिनची लिस्ट  रुग्णाच्या नातेवाईकांना सोपवण्यात आली त्यामध्ये औषधे व ईतर वस्तू होत्या. याबाबत चौकशी केली असता ही औषधे फ्री नाहीत असें डॉक्टर व मेडिकल मधून सांगण्यात आले. संबधित योजना अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यावर ही फ्री आहेत़ ती देतो असे सांगितलं व नंतर लगेचच हे फ्री नाहीत म्हणून हाइयर अँटिबायोटिक मेडिकल मधून आणण्यास सांगितले. बाहेरून समजले की हॉस्पिटल ची स्वताची औषधांची कंपनी आहें व तीच औषधे दिली जाताय व त्याचं मेडिकल मधून घेणे बंधन कारक आहें. 
दहा दिवस होऊन सुध्दा रुग्ण बरा होत नाही म्हणून योजनेच्या अधिकाऱ्यांशी रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करतो या बाबत विचारणा केली असता असे सांगण्यात आले की जेव्हड्या दिवसाचा अप्रुव्हल आहें तेव्हडे दिवस कम्पल्सरी अड्मिट राहावे लागते नाहीतर हॉस्पिटलला योजनेचे पैसे मिळत नाही आणि जर तुम्हाला रुग्णास दुसऱ्या हॉस्पिटल ला शिफ्ट करायचे असेल तर सर्व पैसे भरा आणि घेऊन जा असे सांगितले. 
या सर्व प्रकारावरून असे लक्षात येते की जर रुग्ण 5 दिवसांत बरा होत असेल तरी त्याला दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेऊन योजनेचा प्रोटोकॉल पूर्ण करायचा आणि हॉस्पिटल ची तिजोरी भरायची. रुग्णाची परिस्थीती वा त्याच्या साठी दिवस रात्रीचा कोणताही विचार न करता हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या असणाऱ्या नातेवाईकांचा विचार या हॉस्पिटलने करायला नको का?
 दि. 21/01/2021 रोजी असाच एक प्रकार पाहायला मिळाला. नेहमी प्रमाणे हॉस्पिटल मधील डॉक्टर्स कडून मेडिकल स्टोअरलां ईमेल द्वारे औषधांची लिस्ट पाठवली जाते व ती या योजने अंतर्गत मोफत असते. जर हाइयर अँटिबायोटिक असतील तर ती रुग्णाच्या नातेवाईकांकडे दिली जाते व पैसे भरून ती आणली जातात.परंतु या दिवशी घडलेला प्रकार हा अगदी वेगळाच होता. हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी नेहमी प्रमाणे ईमेल द्वारे मेडिकल स्टोअर ला औषधांची लिस्ट पाठवली व रुग्णाच्या नातेवाईकांना ती पैसे भरून आणण्यास सांगितली. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी कोणती औषधे दिली आहेत़ हे पाहण्या साठी विचारणा केली असता वा प्रिस्क्रिप्शन पाहण्या साठी विनंती केली असता आम्हाला परवानगी नाही तुम्ही पैसे भरा असे उत्तर मेडिकल स्टोअर मधून मिळाले. आपल्या रुग्णास कोणती औषधे लिहिली आहेत़ हे सुध्दा पाहण्याचा हक्क नातेवाईकांना नाही का?
 एम जी एम हॉस्पिटल अंतर्गत होत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजने संदर्भात संभ्रम निर्माण झाला असुन जनसामान्यांन मध्ये या हॉस्पिटल विषयी व या योजने बाबत मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहें. कोरोना च्या नावाखाली एम. जी. एम. हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती पनवेल महानगरपालिकेचे माजी आयुक्त व महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजनेचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. सुधार शिंदे यांना दिली आहें. तरी एम जी एम हॉस्पिटल मधे होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून श्रीमती.सुवर्णा सकपाळ यां रुग्णास डिसचार्ज कधी मिळेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहें.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार