रायते गावात 11 वर्षापासुन श्मशान भुमि नाही...तर,म्हारळ गावची स्मशानभुमीच चोरीला गेली आहे...!!! उल्हास नदी किनारी २८०० लोकसंख्या असलेल्या रायते गावात गेली ११ वर्षे श्मशानभुमि नसल्याने उघड्यावर उल्हास नदी पात्रात प्रेत अग्निसंस्कार करावे लागत असल्याचा गम्भीर प्रकार घडत आहे, तर दुसरी कडे उल्हास नदी किनारी वसलेले म्हारळ गाव कल्याण तालुक्यात येते. मात्र हा परिसर उल्हासनगर मतदार संघात १० वर्षांपासून समाविष्ट आहे.या गावची स्मशानभुमीच गेल्या काही वर्षांपासून चोरीला गेली आहे. गावची हक्काची स्मशानभुमी मिळावी. म्हणून गावातील तरुणांनी हज़ारों पोस्टकार्ड च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन आपली व्यथा कथित केली आहे.म्हारळ गाव हे मुरबाड -अहमदनगर महा मार्गावरील छोटसं गाव. या गावातील लोकसंख्या वाढली.आणि या गावाचे दोन भाग झाले.एक म्हारळ गाव व दुसरा म्हारळ पाडा. या गावाचे दोन भाग झाले तरी ग्रामपंचायत एकच. तर स्मशान भुमी देखिल एकच असायला हवी. मात्र गेल्या १० वर्षा पासून या गावातील नागरीक आपल्या आप्तजनांचे मृत दहन करण्या साठी उल्हासनगर महापालिकेच्या स्मशान भुमीत येतात. तिथं त्यांना अधिकचे पैसे भरावे लागतात. आपण या गावचे स्थानिक नागरीक असतांना हा भुर्दंड का भोगायचा? असा प्रश्न या गावातील तरुणांना भेडसावत आहे, आणि आपल्या गावची हक्काची स्मशान भुमी कुठं गेली? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.तेव्हां या तरुणांच्या लक्षात आले की आपल्या गावची स्मशानभुमी चोरीला गेली आहे. ती परत मिळावी म्हणून या तरुणांनी ई-मेल, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाचा वापर न करता भारतीय डाक पध्दतीचा वापर करत ५० पैश्याच्या पोस्टकार्ड वर आपल्या गावची व्यथा मुख्यमंत्री यांच्याकडे मांडली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार