शीना बोरा हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीसह 40 महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कारागृहातील क्वॉरंटाइन भायखळा कारागृहातील एका महिला कैद्याला 30 मार्च रोजी सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेला ताप आल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल केले.तिची कोरोना चाचणी करताच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. कारागृहाने तत्काळ कारागृहातील सर्व महिला, पुरुष कैद्यांसह कारागृह कर्मचारी, अधिकाऱ्याची चाचणी केली. त्यात इंद्राणी मुखर्जीसह 40 महिला कैदी पॉझिटिव्ह आल्या आहेत. शुक्रवारी त्यांचा प्राथमिक अहवाल येताच, त्यांना कारागृहाच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले.या महिलांना कुठलीही लक्षणे नसल्याचेही कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले.महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताला कारागृह अधीक्षक सदानंद गायकवाड यांनीही दुजोरा दिला आहे. कोरोनाचे संक्रमण नेमके कसे झाले, याबाबत कारागृह प्रशासन अधिक तपास करत आहे. भायखळा महिला कारागृहात 262 कैद्यांची क्षमता असताना 363 महिला कैदी आहेत. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार