*राजेश्री कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी* दिनांक १५/४/२०२१. राजेश्री कॉलनी चिंचपाडा, कल्याण (पूर्व) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मधुकर गंगावणे , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे,निलेश पवार,भागवत गमरे,सुधिर चाबूकस्वार, अविनाश शिरकर, राजेश चौहान, विशाल पटवा, प्रज्ञा गंगावणे , प्रेरणा गंगावणे, मुख्याध्यापिका आशा रणखांबे , संजय बालनाईक , ज्ञानेश्वर राठोड, रामदास सोनवणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.या वेळी लहान मुलांना मंचावर धाडस यावे, त्यांच्यामधील सामान्य ज्ञान जागृत व्हावे. याकरता प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेमध्ये प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या सर्व स्पर्धकांना शालेय वस्तू प्रोत्साहन म्हणून बक्षिसे देण्यात आली. अशी माहिती. आशा रणखांबे यानी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका