राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर भाळवनी या ठिकाणी ११०० बेड चे कोविड सेंटर केले सुरू १०० बेड्स ला ऑक्सीजन सुविधा .........................पारनेर, १७ एप्रिल: ........................... राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत , रुग्णांच्या मृत्यू मध्ये सुद्धा वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आले आहे. तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.आज ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.राज्यातील स्थिती कोरोनामुळे बिघडलेली असताना काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना लोकांच्या मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे शरदचंद्र आरोग्य मंदिर येथे ११०० बेड कोविड सेंटर सुरू केलं आहे. विशेष म्हणजे यामधील १०० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे.तसेच कोविड सेंटरसाठी आमदार लंके यांनी नागरिकांना अन्नदान व विविध सुविधांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला व तालुक्यातून १७ लाख रुपये रोख जमा झाले आहेत. मुंगशी गावाकडून ५ टन धान्य व ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार