किराणा मालाची दुकानं, डेअरी, मच्छी मार्केट दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरूराज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकार कडून लागू करण्यात आलेले निर्बंध अधिकाधिक कठोर केले जात आहेत. आताच मिळालेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र सरकारने सध्या सुरू असणाऱ्या निर्बंधाच्या गाइडलाइन्समध्ये काही बदल केले आहे. नवीन आदेशानुसार आता किराणा मालाची दुकानं, डेअरी, मच्छी मार्केट सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरू राहणार आहे.राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, सर्व खाद्य दुकाने .चिकन, मटण, पोल्ट्री , फिश यासह .कृषि उत्पादनाशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकानं, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं देखील दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतीलमात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत २० एप्रिल २०२१ रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच मोहिमेअंतर्गत सरकारने आता नवी गाइडलाइन जारी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार