उल्हासनगर दिनांक २३/४/२०२१. प्रभाग क्रमांक ४ च्या सभापती अंजली साळवे यांनी लसीकरण केंद्र शाळा नंबर २८ प्रभाग उ न म पा अधिकारी पंजाबी यांना भेट दिली व डॉ सुवेदीका सोबत चर्चा करून तेथील लसीकरणा बाबत आढावा घेतला .दिनांक २४ एप्रिल सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत लाईट बंद राहणार असल्यामुळे तेथील लसीकरणावर परिणाम होऊ नये यासाठी तिथे तत्काल इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याबद्दल प्रभाग अधिकार्‍यांना सांगण्यात आले तसेच तसेच तिथे स्टाफ ची कमतरता पडत असल्याने व गर्दी वाढत असल्याने तिथे स्टाफ वाढवण्यात यावा याबद्दल मा.नाईकवाडे व डॉ पगारे यांच्या सोबत चर्चा करण्यात आली, तसेच एक मेपासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे तेव्हा लवकरच दुसरे लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे ही मागणी करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन