गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा मिळावा असे पत्र मुख्यमंत्री यांना दिले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी तसे पत्र लिहित ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले होते. दरम्यान, आज (५ एप्रिल) मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार