रोज मरे त्याला कोण डरे.................................................................... राज्यात कोरोना महामारी मुळे मागील वर्षी कडक लोक डाऊन घोषित केला आणि महाराष्ट्रातील सर्व व्यापार उद्योग बंद झाले त्यातच सिनेमागृह नाट्यगृह बंद करण्यात आले व सिनेमाची शूटिंग सुद्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे सर्व नागरिकांचे उद्योगधंदे बंद असल्याने उपासमार व कर्जबाजारी सहन करावी लागली. चित्रपट निर्माते करोडो रुपये फायनान्स करणाऱ्या बॅंकांकडून घेऊन बनवत असलेले चित्रपट थांबले गेले. सिनेमा थियेटर. बंद पडली. थीयेटर मध्ये काम करत असलेले कित्येक लोक बेरोजगार झाले. नाट्यकलावंत व नाट्यगृहातील कर्मचारी त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते जोपर्यंत जवळ असलेले पैसे होते तोपर्यंत सगळे व्यवस्थित होते परंतु लॉकडाउन वाढत गेला आणि अडचणी निर्माण झाल्या अनेक लहान सहान भूमिका करणारे कलावंत यांची उपासमार होऊ लागली तर नाट्यगृहात काम करीत असलेले कर्मचारी यांचीही उपासमार होऊ लागली. हे सर्व घडत असताना शिवाजी मंदिर चे बुकिंग क्लार्क हरी पाटणकर हे उघड्या डोळ्याने पाहत होते. त्यांना काही सुचत नव्हते नेमके करावे काय. त्यावर त्यांनी एक तोडगा काढला सर्व सहकाऱ्यांची मदत घेतली आणि अनेक वरिष्ठांकडे मदतीची मागणी केली आणि त्यांना यश मिळाले ..जोपर्यंत लॉक डाउन होते तो पर्यंत मिळेल तिकडून त्यांनी मदत घेतली. आणि त्यातूनच नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांचा थोडाफार का होईना प्रश्न हरी पाटणकर यांनी सोडविला. तब्बल एक वर्ष लॉकडाऊन ला होत आले होते अखेर शेवटी सरकारचा नाट्यगृह सुरू करण्याचा आदेश आला आदेश येताच सर्व नाट्य कलावंत आणि नाट्यगृहात काम करीत असलेले कर्मचारी यांना आनंद झाला आणि लॉंग लाईफ नाटकाचा पहिला प्रयोग दामोदर नाट्यगृह येथे झाला नाट्यगृह सुरू होताना अनेक माध्यामानी आणि मिडिया चॅनेलने बातम्या चे प्रसारण केले. परंतु निसर्गाला हे मान्य नव्हतं. एक वर्ष सुनसान व ओस पडलेले रस्ते पुन्हा वर्दळी चे भाग बनले आणि कोरोना महामारी चा दुसरा टप्पा सुरू झाला . शासनाला सुरुवातीला वाटलं होतं की सर्व काही ठीक होईल परंतु ठीक ठिकाणी नागरिकांची गर्दी रेल्वे लोकल ट्रेन बस सेवा मध्ये भारी प्रमाणात होणारी प्रवाशांची गर्दी . तसेच शॉपिंग मॉल. भाजी मंडई. हॉटेल. नाईट क्लब. बियर बार. अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत होती आणि एकीकडे कोरोना चे रुग्ण ही वाढत होते . त्यातच एप्रिल 2021 मध्ये पुन्हा राज्यात संचारबंदी बंदी लागू करण्यात आली. आणि पुन्हा एकदा सर्व काही ठप्प झाले. नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रश्न पडला. मागील वर्षी २०२० मध्ये जी काही थोडीफार मदत मिळाली होती. आता मिळणे जवळपास. दुरापास्त याला कारण म्हणजे. रोज मरे त्याला कोण डरे. हीच चिंता पुन्हा एकदा नाट्यगृहातील बुकिंग क्लार्क हरी पाटणकर यांना पडली आहे.. कारण नाट्यगृह दुसऱ्यांदा बंद पडले आहेत. २०२० च्या काळात भोगलेल्या यातना .आपल्याच माणसांनी फिरवलेली पाठ. जगायला आवश्यक असलेल्या गोष्टीचा वनवा. हातात पैसा नसल्यावर डोक्यात उच्छाद मांडणारे भुंगे... आता पुन्हा बंद. आता कसे होणारं.? यामुळेच हरी पाटणकर पुन्हा निराश झाले. आज नाट्यक्षेत्रात बुकिंग क्लार्क. व्यवस्थापक. रंगमंच कामगार. काम करीत आहेत. त्यांना कोणी मदत देत नाही आणि लक्षही देत नाही. तरी त्यांचा वाली कोण ? याचे उत्तर कोण देणारं ? आत्ता आम्ही करायचं तरी काय ? हरी ला पडलेले हे प्रश्न आज प्रत्येक क्षेत्रात कोणाला ना कोणाला तरी पडलेले आहेत परंतु त्याची उत्तरे मात्र कोणालाच माहित नाहीत कारण या कोरोना महामारी पुढे सगळेच हातबल झाले आहेत. तरीसुद्धा हरी ची जिद्द अजूनही कायम आहे तो म्हणतोय हे ही दिवस सरतील. व पुन्हा एकदा नाट्यक्षेत्राला सोनेरी कळस लागेल .पण तो पर्यंत कोणी मदत केल्यास जगणे सुलभ होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार