पुणे : पुण्यात आज सायंकाळी ६ पासून पुण्यात कडक लॉकडाऊन राबवण्यात येत आहे. विकेंड लॉकडाऊनची पुण्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुण्यात शुक्रवारी ६ पासून ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र या दरम्यान दूध आणि मेडिकल सुविधा सुरू राहणार आहेत. नागरिकांना वैद्यकीय आणि अतितातडीच्या कारणास्तव बाहेर पडता येणार आहे. कोणत्याही कारणास्तव बाहेर पडल्यास पोलिसांकडून खातरजमा होणार आहे, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश दिलेले आहेत.दरम्यान पुण्यातील स्थानिक व्यापाऱ्यांनी कडक निर्बंधांना ना पसंती दाखवली होती. यासाठी पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर येऊन आंदोलन केलं होतं, काहींनी फलकबाजीही केली आहे.आमचे आर्थिक नुकसान होत असल्याचं कारण व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं, तसेच आज काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला विकण्याचं आंदोलन त्यांच्या दुकानासमोर येऊन केलं. यात मोठ्या प्रमाणात फलकबाजी देखील झाली होती.पुण्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लावणे अनिवार्य असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं, मात्र आता अखेर पुण्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन