कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांकडून सहकार्य करण्यात यावे यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सोमवारी कारखानदारांसोबत बैठक घेतली. या बैठकी दरम्यान - अंबरनाथ शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कारखानदारांकडून नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केले.- यावर औद्योगिक कारखानदार असोसिएशन (आमा) यांच्याकडून कंपन्यांच्या CSR फंडमधून १५ व्हेंटिलेटर व १०० बायपँप मशिनस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष श्री.उमेश तायडे यांनी सांगितले.- तसेच १०० आय.सी.यु. बेडसाठी लागणारे वैद्यकीय यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- यावेळी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांकरिता लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे याबाबत ही चर्चा झाली.- कारखानदार असोसिएशन ( आमा) च्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी "शिवभोजन थाळी " सुरू करण्यात येत असून शेकडो कामगारांना याचा फायदा होणार असल्याने आमदार डॉ. किणीकर यांनी त्यांचे या कामाबद्दल कौतुक केले.याप्रसंगी उपशहरप्रमुख श्री.गणेश कोतेकर, असोसिएशनचे अध्यक्ष श्री.उमेश तायडे, माजी नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, विभागप्रमुख श्री.सचिन गुडेकर, शाखा प्रमुख श्री. सुरेश कदम, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी श्री.धीरज चव्हाण, नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड, एमआयडीसी उपअभियंता श्री.पवार, असोसिएशनचे सेक्रेटरी श्री. परेश शहा,सह सचिव श्री.संदीप तोंडापूरकर, मोदी पंपचे श्री.सुमित मोदी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन