पत्रकारांसाठी लोकल ट्रेन सुविधा सुरु करा अन्यथा 24 ता .ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार ......मुनीर खान कोेरोना महामारी च्या काळात अनेक पत्रकारांनी आपल्या जीवाची बाजी लावून सरकारच्या प्रत्येक गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम व सर्व माहिती जनते पर्यंत पोहचवले तसेचया अहोरात्र कष्ट केले आहे तसेच दुर्दैवाने काही पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे तरी सुद्धा सरकारने पत्रकारांसाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत ही मोठी खंत आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अस्तित्वात असणारे पत्रकार यांना वाऱ्यावर सोडलं असं काम सरकारने केल आहे यासाठी सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आमरण उपोषणाला बसणार अशी माहिती ठाणे जिल्हा पत्रकार रक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मुनीर खान यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे पत्रकारांच्या विविध मागण्या त्या पत्रात समाविष्ट करण्यात आल्या आहेतशहरी पत्रकारांचे मुलभूत प्रश्न व उपेक्ष पत्रकार रक्षक सेना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आम्ही सर्व पत्रकार बंधू आमच्या न्याय व हक्कासाठी निवेदने ,धरणे व आंदोलने केले आहे . ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार असुरक्षित ,अत्यंत विपरीत व हलाखीच्या परिस्थितीत काम करीत असून अत्यंत दुर्लक्षित , उपेक्षित जीवन जगत आहे . केंद्र व राज्य शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामूळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे . या सर्वाला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारच जबाबदार आहे . P. A आमच्या मागण्या 17-11-18 १ ) पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा किती तरी दिवसांपासून रखडलेला असून , या मसुद्यात पत्रकारिता क्षेत्रातील सर्वच पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे .२ ) राज्य सरकारने केवळ एकाच संघटनेला दत्तक घेतले का ? राज्यातील अन्य संघटनांना शासकीय विभागीय असुमित्यांचा वर्षासका नाही ? नेमलेली निष्क्रिय अधिस्विकृती समितीला मुदत वाढ देऊ नये . समितीवर अमल्यनीयोग्यतेनुसार नियुक्त्या करण्यात यावे . ३ ) अधिस्तिकृतीत अनेक जाचक अटी असल्याने ग्रामीण / शहरी भागातील पत्रकार अधिस्वीकृती पासून 11 वचत आहे.त्यामूळे अधिस्कृतीतील४ ) पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ग्रामीण वार्ताहर , शहर बिट वार्ताहर , तालुका प्रतिनिधींना अधिस्विकृती त्यांच्या बातम्या व अनुभवाच्या आधारे देण्यात यावे.तसा अध्यादेश सरकारने जारी करावा . . ५ ) सर्वसाधारण शहरी / ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना दहा वर्ष पत्रकारीतेचा अनुभव ग्राह्य धरून त्यांना अधिस्विकृती देण्यात यावी . ६ ) सर्वच माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा कौटुंबिक सर्वे करा.तसेच सरसकट सर्व पत्रकारांची नोंदणी जिल्हा माहिती कार्यालयात अर्थात सरकारी दप्तरी व्हावी या संदर्भात आदेश पारीत करा . ७ ) सातत्याने आम्ही पत्रकार आमच्या मुलभूत मागण्यांसाठी पत्रव्यवहार , आंदोलने करतोय , प्रत्यक्षात लाभ मात्र सरकार नेहमी मुठभर अधिस्विकृती धारक पत्रकारांना देतात हे योग्य नाही . ८ ) पत्रकार पेन्शन योजनेचा लाभ फक्त मूठभर अधिस्विकृती धारक पत्रकारांना मिळते . खरी गरज आम्हा ग्रामीण / शहरी पत्रकारांना आहे . त्यामूळे पत्रकार पेंशन योजना सर्व पत्रकारांना लागू करा . तसेच पत्रकार पेंशन योजनेतील ६० वर्षे वयाची अट शिथील करून ५० वर्षे करण्यात यावी . ९ ) ग्रामीण व शहरी भागात सतत तीन वर्ष काम करणारे पत्रकार , वार्ताहरांना वृत्तपत्र संपादकाने लेटरहेडवर दिलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरून त्यांना ५० टक्के बस प्रवास सवलत लागू करण्यात यावी . तसेच ही सवलत एक वर्षाकरीता देण्यात यावी आणि दरवर्षी या सवलतीचे नुतनीकरण करण्यात यावे . १० ) सरसकट सर्व पत्रकारांच्या कुटुंबियांना आरोग्य व मुला - मूलींच्या शिक्षणासाठी पर्याप्त योजना जाहिर कराव्यात . आमच्या समस्या व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याची कायदेशीर अमंलबजावणी करावी अशी मागणी आम्हा सर्व पत्रकार बंधूची आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार