उल्हासनगर महानगर पालिका कचरा डंपिंग वर स्थानिक नागरिकांनी अडवील्या कचऱ्याच्या गाड्या उल्हासनगर महानगर पालिकेच्या कॅम्प नंबर 5 मधील कचरा डंपिंग ग्राउंडवर उल्हासनगर मधील कचरा टाकण्यात येतो सध्या पाऊस सुरू असताना पाण्याच्या प्रवाहात कचरा वाहून नागरिकांच्या घरात जात आहे यामुळे स्थानिक नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे असे स्थानिक नागरिक माहिती देत आहे आज दिनांक 12 जून 2021 रोजी सकाळ पासून स्थानिक नागरिकांनी कचरा डंपिंग वर येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन केले . उल्हासनगर ची लोकसंख्या पाहता उल्हासनगर महानगरपालिका कचरा डंपिंग करण्याकरिता पर्याप्त जागेची आवश्यकता आहे उल्हासनगर शहरात दोनच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड असून या दोन्ही ही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड च्या परिसरात लोकवस्ती आहे प्रत्येक पावसाळ्यात डम्पिंग ग्राउंड च्या आसपास रहात असलेल्या नागरिकांना कचऱ्यामुळे त्रास सहन करावा लागतो तर दुसरीकडे उल्हासनगर शहराची लोकसंख्या पाहता व नागरिकांच्या तक्रारी पाहता उल्हासनगर महानगरपालिकेला शहरातील कचरा उचलणे ही गरजेचे आहे . शहरातील कचरा उचलला नाही तर उल्हासनगर शहरात घाणीचे साम्राज्य पसरते . आणि पावसाळ्यापूर्वी डम्पिंग वर कचऱ्याचे प्रमाण वाढले तर कचरा डंपिंग वरील घाणीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते अशा परिस्थितीमध्ये उल्हासनगर महानगरपालिका च्या सत्तेवर असलेल्या सत्ताधारी व उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजना करावी अन्यथा उल्हासनगर शहरात घाणीचे साम्राज्य पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार