जुन्नर - जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावातील जेष्ठ नागरिक रामचंद्र काशिनाथ आल्हाट यांचे वयाच्या ९९व्या वर्षी दिनांक 11 ऑक्टोंबर 2021 रोजी निधन झाले आहे.त्यांनी मोठ्या कष्टातुन आपला परीवार उभा केला असुन त्यांचे मुळ गाव संगमनेर तालुक्यातील धांदरफळ हे त्यांचे गाव आहे अनेक वर्षापूर्वी ते जुन्नर तालुक्यातील शिरोली येथे स्थायिक झाले होते.त्यांनी कष्ट हाच देव मानत त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला व आपल्या चार मुलांवर अतिशय चांगले संस्कार करत मुलांना समाजिक कार्याची आवड निर्माण केली आहे.अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपल्या घामाने संसार व शेती खुलवली असुन आपल्या मधुर वाणीमुळे व कष्टमय स्वभावामुळे ते खोडद व शिरोली,बु. पंचक्रोशीत प्रसिध्द होते तसेच जुन्या पिढीतील घटनांचा साक्षीदार म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जात होते.त्यांनी शेती मध्ये राबताना वेगवेगळे प्रयोग राबवले होते.दुरदुर्शनवर लोकप्रिय असलेल्या "आमची माती, आमची माणसं" या एका माहितीपटा मध्ये कोबीचे दुबार पिक घेतल्याने त्यांची विशेष मुलाखत ही पार पडली होती कारण त्यांनी केलेला प्रयोग हा पूर्णपणे सफल झाला होता तसेच.त्यांना विविध संघटना व संस्था यांनी आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन ही गौरवले होते.अतिशय मधुर वाणीचे असलेले रामचंद्र काशिनाथ आल्हाट हे उतारवयामुळे अलीकडे आजारी होते.काल त्यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधी शिरोली गावातील स्मशानभुमीत काल सात वाजता पार पडले यावेळी त्यांचे पाथर्डी, अकोले,संगमनेर,मुंबई परिसरातून नातेवाईक,स्नेही यावेळी उपस्थित होते.त्यांचा लोकप्रिय स्व.खासदार निवृत्ती शेरकर यांच्या कुटुंबाशी विशेष स्नेह होता.त्यांनी शेवट पर्यंत जपण्याचे काम त्यांनी केले.त्यांच्या जाण्यामुळे जुन्या पिढीतील व धार्मिक क्षेञातील एक अभ्यासु व्यक्तीमत्व हरपल्याची भावना समाज्यातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.मातंग समाज्यात ही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असत कारण सामजिक चळवळीच्या बाबतीत नेहमीच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांना ते मार्गदर्शन करत असत.आपल्या परीवारातील व नात्यातील प्रत्येक गोष्टींंची माहिती घेत असत व चुकीच्या होणाऱ्या गोष्टींना ते सष्टपणे विरोध करण्याचा त्यांचा स्वभाव होता.त्याच कारणामुळे त्यांचा नातेवाईक व मातंग समाज्यात आदरयुक्त दबदबा त्यांचा होता.त्यांच्या मागे दोन भाऊ शंकर व महादेव आल्हाट तसेच चार मुले व सुना आहेत.मुले एकनाथ रामचंद्र आल्हाट,जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामचंद्र आल्हाट,गुलाब रामचंद्र आल्हाट,काँग्रेस पक्षाचे माजी सेक्रेटरी बाळासाहेब उर्फ लक्ष्मण आल्हाट,तसेच नातु गणेश एकनाथ आल्हाट,अनिकेत अशोक आल्हाट, विक्रांत बाळासाहेब आल्हाट,मयूर गुलाब आल्हाट,सुशांत बाळासाहेब आल्हाट,भाऊ असा मोठा परीवार त्यांच्या मागे आहे.त्यांचा दशक्रिया विधी जुन्नर तालुक्यातील शिरोली ( बुद्रुक) येथे बुधवार रोजी दिनांक 20 /10/2021 रोजी सकाळी 7.30 वा होईल येथे पार पडणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांना आधिन राहून हा दशक्रिया विधी पार पडणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार