रचनाकार यांनी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीमनसेने लाक्षणिक उपोषण स्थगित केले उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीतील रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी मनसेने लाक्षणिक उपोषण केले असता पालिकेचे नगर रचनाकार यांनी आश्वासन दिले मनसेने आपले उपोषण स्थगित केले.यासंदर्भात सविस्तर माहिती देताना मनसेचे संजय घुगे यांनी सांगितले की शहरात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना सतत घडत आहेत. परंतु त्यांना फक्त आश्वासन दिले जाते. त्यांच्या मदतीसाठी कोणीही जात नाही. शहरात बिल्डर लॉबी सक्रिय आहे या बिल्डर लॉबी ला राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत चालले आहे. त्यामुळे हे संगनमताने खाली प्लॉट हडपण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे रहिवाशांवर अन्याय केला जातो. या रहिवाशांना न्याय मिळावा हीच मनसेची रास्त मागणी असल्याचे घुगे यांनी सांगितले. १२ लोकांचा मृत्यू झाला पण त्यांना ५ लाख रुपये देण्यात आले नाही. राजकीय नेते प्लॉट हाडपण्याच प्रयत्न आहे. महापौर सेनेचा, पालकमंत्री सेनेचा, मुख्यमंत्री सेनेचा मग अडचण कुठे आहे. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना न्याय मिळालाच पाहिजे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. यावेळी पालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी पालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे यांनी मनसेला दिलेल्या आश्वासनात म्हंटले आहे की आपल्या दि. २७/१०/२०२१ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती व अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनाविरुद्ध आप लिकेसमोर महान उपोषणास बसण्यात असल्याचे आपण कळविले आहे.याबाबत उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व २००५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्याबाबत शासनाच्या दि. २७/०७/२०२१ च्या शासन निर्णय क्र. १२१९/२१७२/प्र.क्र. ११०/१९/ नवि१२ याद्वारे अप्पर मुख्य सचिव महसूल याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली असून तिच्या ३ सभा झालेल्या आहेत. सदर समिती उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत शासनाने परत केलेल्या अध्यादेश क्र. १२/२००६ मध्ये सुधारणा सुचवून त्याद्वारे धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व २००५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्याबाबत येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात येतील. अशा परिस्थितीत आपणास विनंती करण्यात आली असून सदर उपोषण मागे घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे अशी विनंती पालिका मार्फत करण्यात आली.पालिका नगर रचनाकार प्रकाश मुळे अधिकारी यांनी आश्वासन दिले यावेळी मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर सचिव शालिग्राम सोणवने,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडाके,मुकेश सेठपलानी,सुभाष हटकर,विभाग अध्यक्ष सुहास बनसोडे,योगिराज देशमुख,सागर चौहाण,उपविभाग अध्यक्ष रवी पाल,मधूकर बागुल,सुनिल रोहडा,मनविसे शहर सचिव सचिन चौधरी,तन्मेश देशमुख,शाखा अध्यक्ष सुधिर सावंत,संजय नार्वेकर,रवी बागुल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार